Nagar | शिवस्वराज्य यात्रेचे आठरे मित्र मंडळाकडून स्वागत
Updated On:

नगर, (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) च्यावतीने नगर जिल्ह्यात शिवराज्य यात्रेचे आगमन झाले आहे. नंदनवन लॉन येथे सकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार नीलेश लंके आदी उपस्थित होते. डॉ. अनिल आठरे मित्र मंडळाकडून यात्रेचे स्वागत करून सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
नगरमधून डाॅ. आठरे विधानसभा लढविण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) इच्छुक असून त्यादृष्टीने त्याची तयारी चालू आहे.
या यात्रेला नगरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आठरे यांनी केले होते.त्यास चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी नगरकरांचे आभार मानले.




