Weightlifting World C’ships : मिराबाईच्या ‘त्या’ निर्णयावर भारतीय ऑलिम्पिक संघटना नाराज…
Updated On:

नवी दिल्ली :- भारताची ऑलिम्पिक पदकविजेती महिला वेट लिफ्टर मीराबाई चानू हीने घेतलेल्या निर्णयावर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.
येत्या सोमवारपासून सौदी अरेबियातील रियाध येथे सुरू होणाऱ्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये मिराबाई केवळ सहभागी होणार असून वजन मात्र, उचलणार नसल्याने ही टीका होत आहे.
जागतिक स्पर्धा ही आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता फेरी असल्यामुळे या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी सहभाग घेणे बंधनकारक आहे. त्यासाठीच मीराबाई जागतिक स्पर्धेला उपस्थित राहणार आहे.
जागतिक स्पर्धा येत्या सोमवारपासून 17 सप्टेंबर या कालावधीत रियाध येथे होणार आहे. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धा येत्या 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर यादरम्यान चीनमधील हांगझाऊ येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यातही मिराबाई सहभागी होणार का हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.





