Athletics : वजनावर नियंत्रण ठेवणे खेळाडूची वैयक्तिक जबाबदारी – मेरी कोम

Mary Kom :- भारताच्या विनेश फोगटला १०० ग्रॅम वजन जास्त असल्याने ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीतून बाहेर व्हावे लागले होते. त्यानंतर विनेशने थेट कुस्तीला अलविदा करून ती राजकारणाच्य आखाड्यात उतरली. मात्र, आज वादावर सहा वेळा जगज्जेती असलेल्या मेरी कोमने, वजानावर नियंत्रण ठेवणे ही खेळाडूंची वैयक्तिक जबाबदारी असल्याचे सांगितले.
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती ४२ वर्षीय मेरी कोम हिने येथे एका कार्यक्रम दरम्यान प्रथमच विनेशबद्दल बोलताना सांगितले की, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम मुदतीत वजन व्यवस्थापित करणे ही खेळाडूची जबाबदारी आहे. या गोष्टीने मी देखील निराश झाले होते. मात्र, मी माझे वजन देखील याच पद्धतीने सांभाळत आहे. वजन नियंत्रणात राखणे ही सर्वस्वी माझी जबाबदारी असून वाढलेल्या वजनासाठी मी कोणालाही दोष देवू शकत नाही.
तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकत नसला, तर तुम्ही क्षमतेनुसार खेळू शकणार नाहीत. तुम्ही खेळाला नाहीत तर तुम्हाला पदक कसे मिळणार, असा सवाल करताना, वजन नियंत्रणात ठेवणे ही अवघड प्रक्रिया असल्याचे तिने मान्य केले.





