Independence Day 2024 : अशा प्रकारे, 15 ऑगस्टला बनवा आणखी खास, पहा खेळाशी संबंधित हे टॉप-10 बॉलिवूड चित्रपट…

Watch Top 10 Bollywood Sports Movies on Independence Day 2024 : यंदा संपूर्ण देश गुरुवारी स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. जिथे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हा दिवस साजरा करण्याचे नियोजन करत आहे. त्याच वेळी, आम्ही तुमच्यासाठी एक सल्ला देखील घेऊन आलो आहोत. 15 ऑगस्टच्या निमित्त प्रेक्षणीय स्थळांव्यतिरिक्त, आपण देशभक्तीच्या भावनांनी भरलेले अनेक बॉलीवूड स्पोर्ट्स चित्रपट देखील पाहू शकता.
1. दंगल :- आमिर खान, साक्षी तन्वर, फातिमा सना शेख या स्टार कलाकारांचा समावेश असलेला चित्रपट “दंगल” 2016 साली प्रदर्शित झाला होता. हा एक बॉलिवूड व्यक्तिचित्रपट आहे. दंगल हा चित्रपट म्हणजे महावीर सिंग आणि त्यांच्या दोन मुली, गीता आणि बबिता फोगट यांच्या जीवनावर आधारित एक विलक्षण सत्य कथा आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या मते, या चित्रपटाने जगभरात 702.475 कोटी रुपयांची कमाई केली होती. तुम्ही OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.
2. कौन प्रविण तांबे : 41 व्या वर्षी निवृत्ती घेण्याऐवजी खेळाडू पदार्पण करीत असेल तर काय म्हणावे? तुम्ही जर क्रिकेट चाहते असाल तर ‘कोण प्रवीण तांबे’ हा सिनेमा आवर्जून पहायला हवा. हा तोच खेळाडू आहे, ज्याने आयुष्यातील 20 वर्ष फक्त गली क्रिकेटला दिली, ज्याला क्रिकेटर म्हणून नावारुपाला येण्यासाठी आयुष्यातली 41 वर्ष खर्च करावी लागली, त्याची क्रिकेटमध्ये पहिल्यांदा वयाच्या 41 व्या वर्षी दखल घेण्यात आली. तसेच द वॉल राहुल द्रविड प्रविण तांबेतलं कौशल्य हेरतो आणि पुढे जी काही संधी मिळाते त्याचं सोनं प्रवीण तांबे सोनं करतो. क्रिकेटमध्ये शिखर गाठण्याची धडपड खेळाडूला कुठवर नेते हा पैलू चित्रपटात फारच हृदयस्पर्शीपणे मांडण्यात आला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अंगावर शहारे येतात. सततच्या अपयशाने वैतागला असाल किंवा परिस्थितीसमोर गुडघे टेकण्याचा विचार येत असेल तर हा चित्रपट नक्की पहावा. या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदेने प्रवीण तांबे यांची भूमिका साकारली आहे.
3. चक दे! इंडिया : – बाॅलिवूडचा स्टार अभिनेता शाहरुख खानचा चित्रपट “चक दे! इंडिया” 2007 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट भारतीय महिला हॉकी संघावर आधारित हिंदी चित्रपट आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या मते, या चित्रपटाने जगभरात 10.18 कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर उपलब्ध आहे.
4. भाग मिल्खा भाग :- फरहान अख्तरची प्रमुख भूमिका असलेला भाग मिल्खा भाग हा 2013 साली प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. ह्या चित्रपटाची कथा लोकप्रिय भारतीय धावपटू व पद्मश्री पुरस्कार विजेता मिल्खा सिंग ह्याच्या जीवनावर आधारित आहे. धावपटू मिल्खा सिंगवरील ‘भाग मिल्ख भाग’मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीच्या रक्तपातात, संहारात बालपण उद्ध्वस्त झाल्यावरही अथक मेहनतीच्या जोरावर परिस्थितीवर मात करून देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या एका खेळाडूची म्हणजेच मिल्खा सिंग यांची कहाणी आहे. 2013 सालच्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी हा एक चित्रपट होता. बॉक्स ऑफिस इंडियानुसार, या चित्रपटाने जगभरात तुफान कमाई केली होती.
5. ‘पान सिंह तोमर’ : हा सत्यघटनेवर आधारित आणि पान सिंग तोमर या धावपटूच्या जीवनावर हा सिनेमा बेतलेला आहे. चंबल गावाचे रहिवासी असलेले पान सिंग तोमर तब्बल सात वर्ष एथलिटचे नॅशनल चॅम्पियन होते, मात्र त्यांच्यापुढे अशी काही परिस्थिती निर्माण होते की ते डाकू बनतात. या सिनेमात पान सिंग तोमरची आव्हानात्मक भूमिका अभिनेता इरफान खानने साकारली आहे.
6. एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी :- भारतीय क्रिकेट खेळाडू व माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी ह्याच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. सुशांत सिंग, राजपूत कियारा, अडवाणी दिशा पटनी स्टारर चित्रपट “एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी” 2016 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटासाठी सुशांतनी किमान एक ते दीड वर्ष धोनीची भूमिका साकारण्याकरिता प्रचंड अभ्यास व मेहनत घेतली होती. बॉक्स ऑफिस इंडियानुसार, या चित्रपटाने जगभरात 18.98 अब्ज रुपये कमावले होते. OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर तुम्ही या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.
7. मेरी कोम : मेरी कोम हा 2014 साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. प्रियांका चोप्राची प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटामध्ये प्रसिद्ध भारतीय महिला बॉक्सिंगपटू व ऑलिंपिक कांस्य-पदक विजेती मेरी कोम हिचा संघर्षमय प्रवास दाखवला आहे. महिला बॉक्सर मेरी कोमने जगभरात नाव कमावले आहे. सिनेमाव्दारे तिच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी माहित करू घ्यायच्या असतील तर हा चित्रपट नक्की पहावा. बॉक्स ऑफिस इंडियानुसार, या चित्रपटाने जगभरात 86.19 कोटी रुपयांची कमाई केली होती. मेरी कॉम हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर उपलब्ध आहे.
8. सूरमा : एका ख-या नायकाच्या कथेवर आधारित असलेला चित्रपट म्हणजे ‘सूरमा’. एकेकाळचा हॉकीच्या मैदानावरचा चकाकता तारा म्हणजेच, हॉकीचे माजी कर्णधार संदीप सिंह यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट आहे. हॉकी हे करिअर म्हणून स्वीकारण्यापासून तर हे करिअर अगदी अत्त्युच्च शिखरावर असताना एका जीवघेण्या अपघातात पायातील गेलेली शक्ती परत मिळवण्यापर्यंत संदीप सिंह यांचा प्रवास सोपा नव्हता आणि त्याच्या या प्रवासाला दिग्दर्शक साद अलीने पूरेपूर न्याय दिलाय. दिलजीत दोसांझ, तापसी पन्नू, अंगद बेदी स्टारर चित्रपट “सूरमा” 2018 साली प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिस इंडियानुसार, या चित्रपटाने जगभरात 48.07 कोटी रुपयांची कमाई केली होती. तुम्ही नेटफ्लिक्स आणि सोनी लिव्हवर सूरमा चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.
9. लगान : वन्स अपॉन अ टाइम इन इंडिया : आमीर खान प्रॉडक्शन निर्मित आणि प्रमुख भूमिकेत असलेला ‘लगान’ हा 2001 साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. ब्रिटीशकालीन मध्यभारतातील प्रांतात एका खेड्यातील गावकरी दुष्काळामुळे महसूली कर माफ करा ही विनंती करण्यास ब्रिटीश अधिकाऱ्यांकडे जातात, पण जुलमी अधिकारी दुष्काळावर मदत देण्याऐवजी आमच्या क्रिकेट खेळाची टिंगलटवाळी करता म्हणून दुप्पट कर (लगान) लावतो तसेच जर समजा या खेळात गावकऱ्यांनी हरवून दाखवले तर तीन वर्षाचा लगान माफ करण्याची पैज् समोर ठेवतो. गावचा तरुण भुवन हे आव्हान स्वीकारतो आणि पूर्ण करतो. अशी या चित्रपटाची कथा आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या मते, या चित्रपटाने जगभरात 659.7 कोटी रुपयांची कमाई केली होती.
10. ‘इकबाल’ : 2005 साली प्रदर्शित झालेल्या ‘इकबाल’ या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदेने इकबालची भूमिका साकारली होती. इकबाल हा मूकबधिर मुलगा असतो. परंतु, त्याला क्रिकेटचे प्रचंड वेड असते. मूकबधिर पणा व गरिबी, वडिलांचाही विरोध अशा येणाऱ्या सर्व अडचणींचा सामना करत इकबालची निवड क्रिकेट टीम मध्ये होते. अशी चित्रपटाची कथा असून श्रेयस तळपदे, नसीरुद्दीन शाह, श्वेता बसू प्रसाद स्टारर चित्रपट “इकबाल” 2005 साली प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिस इंडियानुसार, या चित्रपटाने जगभरात 5.60 कोटी रुपयांची कमाई केली होती.





