Shiv Chhatrapati Sports Award 2023-24 : बीडच्या अविनाश साबळेसह 47 खेळाडूंना ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ जाहीर, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर….

Shiv Chhatrapati Sports Award 2023-24 :- महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या 2022-23 वर्षाच्या शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली. शासनाने जाहीर केलेल्या यादीमध्ये 47 खेळाडूंना शिवछत्रपती, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकाला देण्यात येणारा जिजामाता पुरस्कार 6 मार्गदर्शकांना, साहसी क्रीडा पुरस्कार दोघांना तर 8 दिव्यांग खेळाडूंना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
सन 2022-23 चा जीवन गौरव पुरस्काराने दिग्गज बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रदीप गंधे यांनी 1982 च्या आशियाई स्पर्धेत मिश्र दुहेरी व पुरुष सांघिक गटात कांस्यपदकाची कमाई केली होती. राज्य शासनाच्या वतीने उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकाला देण्यात येणारा जिजामाता पुरस्कारासाठी पवन भोईर (जिम्नॅस्टिक्स), अनिल भोईल (कबड्डी), शुभांगी रोकडे (तिरंदाजी), राजाराम घाग (दिव्यांग खेळांचे क्रीडा मार्गदर्शक), दिनेश लाड (क्रिकेट) व सुमा शिरूर (नेमबाजी) यांची निवड करण्यात आली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारांत अंतिम फेरीत स्थान मिळवणाऱ्या अविनाश साबळे शिवछत्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याने पॅरिसमध्ये इतिहास घडविला होता. यापूर्वी कोणताही भारतीय खेळाडूने या स्पर्धेची अंतिम फेरीत स्थान मिळविले नव्हते. मात्र अंतिम फेरीत पदकापासून दूर राहिला होता.
राज्य साहसी क्रीडा पुरस्कार मिळविणारे खेळाडू : जल : जयंत दुबाळे (नागपूर), जमीन : कस्तुरी सावेकर (कोल्हापूर).
शिवछत्रपती पुरस्कार मिळविणारे खेळाडू पुढील प्रमाणे : अविनाश साबळे (एथलेटिक्स) दीप रामभीया (बॅडमिंटन), निलम घोडके , संदीप दिवे, अभिजीत त्रिपणकर (कॅरम), आदित्य मित्तल (बुद्धिबळ), शुशिकला आगाशे, प्रतिक पाटील (सायकलिंग), कशीश भराड, गिरीश काते (तलवारबाजी), कुणाल कोठेकर (जिम्नॅस्टिक), जान्हवी जाधव, अक्षय तरळ, रुपाली गंगावणे (मल्लखांब), रुचिता विनेरकर, रुद्रांक्ष पाटील, तुषार माने (नेमबाजी), याश्वी शाह, सुहृद सुर्वे (स्केटिंग), दिया चितळे (टेबलटेनिस), श्रेयस वैद्य (वॉटरपोलो), श्रुती कडव, सर्वेश मेनन (आट्यापाट्या), सिद्धांत मोरे (शरीरसौष्ठव), पूनम कैथवास, रेनॉल्ड जोसेफ (बॉक्सिंग), अक्षता ढेकळे (हॉकी), अपूर्वा पाटील (ज्युदो), अंकित जगताप, पंकज मोहिते (कबड्डी), प्रियंका इंगळे, सुयश गरगटे (खो-खो), अक्षया शेडगे, धर्मेंद्रकुमार यादव (पॉवरलिफ्टींग), कोमल वाकळे (वेटलिफ्टिंग), नंदिनी साळोखे (कुस्ती), कल्याणी जोशी (वुशू), विष्णू सर्वानन (याटिंग), वैष्णवी पाटील, श्रीधर निगडे (रग्बी), श्रेया नानकर, साहिल खान (स्पोर्ट्स क्लायबिंग), नेहा देशमुख, जयेश मोरे (सॉफ्टबॉल), पूर्वा किनरे, नितिन पवळे (योगासने)
दिव्यांग खेळाडू : आफ्रिद आत्त्तर (जलतरण), निलेश गायकवाड (बॅडमिंटन), अन्नपूर्णा कांबळे (एथलेटिक्स) इतर खेळ प्रकार : अनिता चव्हाण (व्हॅलचेयर तलवारबाजी) लता उमरेकर (बॅडमिंटन), प्रियेषा देशमुख, नताशा जोशी, प्रांजली धुमाळ (नेमबाजी),





