Rinku Singh : लग्नाचा मुहूर्त ठरला! रिंकू सिंह अन् प्रिया सरोज ‘या’ दिवशी अडकणार विवाह बंधनात
Rinku Singh : आता दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने विवाहाची तारीख निश्चित करण्यात आली.

Rinku Singh : भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि उत्तर प्रदेशातील मछलीशहर लोकसभा मतदारसंघाच्या समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
लखनौ येथील रमाडा हॉटेलमध्ये दोघांचा विवाह सोहळा पार पडणार असून, दोन्ही कुटुंबांकडून लग्नाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. राजकीय, प्रशासकीय तसेच क्रिकेट विश्वातील अनेक मान्यवरांना या विवाहासाठी आमंत्रित करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
यापूर्वी रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा विवाह वाराणसीतील ताज हॉटेलमध्ये होणार असल्याची चर्चा होती. मात्र, रिंकूच्या वडिलांच्या निधनानंतर विवाहाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने विवाहाची तारीख निश्चित करण्यात आली. दोघेही ४ डिसेंबर २०२६ रोजी विवाहबद्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जून २०२५ मध्ये झाला होता साखरपुडा (Rinku Singh )
रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा जून २०२५ मध्ये साखरपुडा झाला होता. त्यानंतर हे दोघेही सातत्याने चर्चेत राहिले आहेत. एका मुलाखतीत प्रिया सरोज यांनी त्यांच्या नात्याबाबत काही माहिती शेअर केले होती.
प्रिया आपल्या बहिणीच्या फूड ब्लॉगिंग पेजचा प्रचार करत असताना रिंकू सिंगशी त्यांचा संवाद सुरू झाला. पुढे या संवादाचे रूपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमसंबंधात झाल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. वडिलांना सरकारी नोकरी असलेला मुलगा हवा होता, असा खुलासाही प्रिया यांनी केला होता.
मात्र, रिंकूची भारतीय संघात निवड झाल्यानंतर परिस्थितीत बदल झाला. २०२३ मध्ये रिंकूच्या दमदार कामगिरीनंतर आणि भारतीय संघात त्याची निवड झाल्यानंतर या नात्याबाबत कुटुंबीयांचा दृष्टिकोन बदलला. २०२४ मध्ये प्रियाच्या दिराने तिच्या वडिलांना या नात्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने लग्नाचा निर्णय घेण्यात आला.
रिंकू सिंहची क्रिकेट कारकीर्द (Rinku Singh)

Rinku Singh : लग्नाचा मुहूर्त ठरला! रिंकू सिंह अन् प्रिया सरोज ‘या’ दिवशी अडकणार विवाह बंधनात
रिंकू सिंह आणि प्रिया सरोज हे दोघेही उत्तर प्रदेशातील आहेत. अलीगढमधील सामान्य कुटुंबातून आलेल्या रिंकूने आपल्या मेहनत आणि प्रतिभेच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले.
रिंकूला टी-२० क्रिकेटमधील आक्रमक फलंदाज आणि प्रभावी फिनिशर म्हणून ओळखले जाते. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्समध्ये त्याची कामगिरी लक्ष वेधक राहिली आहे.
आता क्रिकेट आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांशी संबंधित या चर्चेतील जोडीच्या विवाहाची तयारी सुरू झाली असून, चाहते दोघांनाही सोशल मीडियावरून पोस्ट करत शुभेच्छा देत आहेत.





