Aamir Khan Third Marriage: आमिर खान पुन्हा अडकणार विवाहबंधनात? ५ जुलैला गौरी स्प्रॅटसोबत रजिस्टर लग्नाची चर्चा
Aamir Khan Third Marriage गौरी स्प्रॅटबद्दल बोलायचे झाल्यास, ती मूळची बेंगळुरूची आहे. ती फॅशन क्षेत्राशी संबंधित असून तिने लंडनमधील युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्समधून शिक्षण घेतले आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौरी सध्या आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसबरोबरही काम करत आहे.

Aamir Khan Third Marriage: बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Amir Khan ) पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून आमिर खान आणि त्याची मैत्रीण गौरी स्प्रॅट यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा सुरू आहेत. आता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, ५ जुलै रोजी आमिर आणि गौरी रजिस्टर पद्धतीने लग्न करू शकतात. मात्र, या वृत्ताला अद्याप आमिर खान किंवा त्याच्या टीमकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
रिपोर्ट्सनुसार, हे लग्न अत्यंत साधेपणाने आणि खासगी पद्धतीने पार पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील आमिर खानच्या घरीच रजिस्टर मॅरेज होऊ शकते, अशी चर्चा आहे. या सोहळ्यात केवळ दोन्ही कुटुंबातील सदस्य, जवळचे नातेवाईक आणि काही निवडक मित्र उपस्थित राहतील, असेही सांगितले जात आहे. (Aamir Khan Third Marriage)
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, या लग्नासाठी सुमारे १०० ते १५० पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. आमिर आणि गौरी यांनी काही जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना स्वतः भेटून आमंत्रित केल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींना या सोहळ्याचे निमंत्रण दिले जाणार नसल्याचीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे हा विवाह पूर्णपणे कौटुंबिक आणि खाजगी स्वरूपाचा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Aamir Khan Third Marriage)
)
Aamir Khan Gauri Spratt
जर हे वृत्त खरे ठरले, तर हे आमिर खानचे तिसरे लग्न असेल. आमिरने १९८६ मध्ये रीना दत्ता हिच्याशी पहिला विवाह केला होता. या दोघांना जुनैद खान आणि आयरा खान ही दोन मुले आहेत. जवळपास १६ वर्षांच्या संसारानंतर २००२ मध्ये दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. (Aamir Khan Third Marriage)
यानंतर २००५ मध्ये आमिरने चित्रपट निर्माती किरण राव हिच्याशी विवाह केला. या दोघांना आझाद नावाचा मुलगा आहे. २०२१ मध्ये आमिर आणि किरण यांनीही परस्पर संमतीने विभक्त होण्याची घोषणा केली होती. मात्र, घटस्फोटानंतरही दोघे अनेक प्रकल्पांमध्ये एकत्र काम करत असून मुलाच्या संगोपनाची जबाबदारीही मिळून सांभाळत आहेत.
गौरी स्प्रॅटबद्दल बोलायचे झाल्यास, ती मूळची बेंगळुरूची आहे. ती फॅशन क्षेत्राशी संबंधित असून तिने लंडनमधील युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्समधून शिक्षण घेतले आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौरी सध्या आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसबरोबरही काम करत आहे. (Aamir Khan Third Marriage)
गेल्या काही महिन्यांत आमिर आणि गौरी अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना अधिक वेग आला. आमिरनेही यापूर्वी गौरीसोबतच्या नात्याची कबुली दिल्यानंतर चाहत्यांमध्ये या जोडीबद्दल उत्सुकता वाढली होती. आता ५ जुलै रोजी त्यांच्या कथित लग्नाच्या चर्चेमुळे सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
तथापि, सध्या समोर आलेली माहिती ही केवळ मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. आमिर खान किंवा गौरी स्प्रॅट यांनी लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे ५ जुलैला खरोखरच हे लग्न होते की नाही, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.





