Weather Alert today : मुंबईकरांनो काळजी घ्या; राज्यात आज कुठे कुठे पाऊस बरसणार?

मुंबई – मागच्या आठवड्यात कोकणात आलेल्या अस्मानी संकटाने अनेकांचे होत्याचे नव्हते झाले आहे. त्यातून कोकणासह राज्य सावरत असतानाच आता पुन्हा एकदा हवामान खात्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
आगामी चार दिवस राज्यातील काही महत्वाच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्यावतीनं हा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या महाराष्ट्र, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिली आहे.
महाराष्ट्रात आज कुठे कुठे पाऊस बरसणार?
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्यावतीनं हा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडतोय. उत्तर कोकणात ठाणे , पालघर आणि मुंबई मध्ये मुसळधार पाऊस होईल, असं अंदाज वर्तवला आहे.
तर दुसरीकडे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, बुलडाणा, वाशिम, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.





