Weather Alert: सूर्य आग ओकतोय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट, अलर्ट जारी
Weather Alert: नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन

Weather Alert: भारतासह महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेने कहर केला असून नागरिक हैराण झाले आहेत. सध्या अवकाळी संकटाचा धोका टाळला असला तरी आता उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
27 एप्रिलसाठी हवामान विभागाने धोक्याचा अलर्ट जारी केला आहे. विदर्भात होरपळून काढणारी उष्णतेची लाट येणार असून 3 जिल्ह्यांना ऑरेंज तर 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल. अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि बुलढाणा या जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल. आज याठिकाणी पावसाची शक्यता नाही.
उन्हाचा पारा पुन्हा चढणार (Weather Alert)
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये उष्णतेचा पारा चढला आहे. हवामान कोरडे आणि उष्ण राहील. तर दुसरीकडे, मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार असून तापमानाचा पारा पुन्हा चढणार आहे. सोमवारपासून पुढील काही दिवस पावसाची कोणतीही शक्यता नाही. Weather Alert
दरम्यान, पुढील तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहील, अशी शक्यताही व्यक्त केली आहे. या कालावधीत नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. Weather Alert
मे महिन्याच्या सुरुवातीला पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे तापमानात घट होणार असली, तरी नागरिकांनी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले.
मे महिन्याच्या सुरुवातीला मिळणार दिलासा
वायव्य भारतात २९ आणि ३० एप्रिल रोजी तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसने घट होऊ शकते. तर, मध्य भारतात २८ ते ३० एप्रिल दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तापमान २ ते ३ अंशांनी खाली येईल, अशी शक्यता आहे. महाराष्ट्रात १ मे पर्यंत तापमानाचा पारा २ ते ३ अंशांनी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढत्या तापमानापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :






