“जे अंगावर येथील त्यांना शिंगावर घेऊ, मात्र….”; शिवसेनेच्या आमदाराचा भाजप आमदाराला थेट इशारा

Narendra Bhondekar : नुकतीच भंडाऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य सभा पार पडली. या जाहीर सभेतूनच शिंदेंच्या आमदाराने भाजप आमदाराला इशारा दिला आहे. यामुळे आता येथील राजकारण चांगलेच तापले आहे. जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घेऊ, मात्र शांत राहणार नाही, असा थेट इशारा शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडकर यांनी भाजप आमदार परीणय फुके यांचे नाव न घेता दिला आहे. सत्ताधारी आमदारांमध्येचं पक्ष वाढीवरून शाब्दिक वॉर सुरू झाल्याने भंडाऱ्यातील राजकीय वातारण चांगलेच तापले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडली. जिल्ह्यातील शिंदेंच्या शिवसैनिकांनी पक्षाला राम राम ठोकत मित्रपक्ष असलेल्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या आमदार परिणय फुके यांच्यात वादाची ठिगणी पडली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भंडारा येथे आभार सभेला आले असताना त्यांच्या उपस्थितीत भोंडेकरांनी आमदार फुके यांचे नाव न घेता त्यांना थेट इशारा दिल्याने अनेकांच्या भुवय्या उंचवल्या आहेत. शिवसेना भंडारा जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष असून आता पक्ष मोठा होत असल्याने दुसऱ्या पक्षातील विरोधक आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आमदार भोंडेकरांनी केला आहे.
विरोधी पक्षाचे नेते आमच्यावर टीका केली तर चालेल, पण आमच्या पक्षावर आणि नेत्यांवर टीका टिप्पणी करीत आहे, हे आम्ही खपवून घेणार नाही, असा थेट इशारा भोडेकरांनी दिला आहे. त्यांना मंत्रिमद न दिल्याची खंतही त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर भाषणात व्यक्त केली.
हेही वाचा : ओडिशात श्री गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी ; ३ जणांचा मृत्यू, ३० जण जखमी





