Eknath Shinde : दिसतील तिथे ठोकणार.! शिंदेंचा 107 पाकिस्तानी नागरिकांना इशारा
Updated On:

बुलढाणा – जम्मूमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना 1 मे च्या आधी भारत सोडण्याचे फर्मान काढले आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात असलेले 107 पाकिस्तानी नागरिक गायब असल्याची बातमी काही वृत्तवाहिन्यांनी चालवली. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते १०७ लोकं दिसतील तिथे ठोकणार असे म्हटले आहे.
शिंदे म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ देश सोडण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रात देखील ज्यांची नोंद झाली त्यांनी देश सोडावा, असे फर्मान सरकारने काढले आहेत. मुख्यमंत्र्यांनीदेखील इशारा दिलेला आहे.
तर, मीसुद्धा भाषणात बोललो की, 107 लोकं जे कुठे असतील त्यांना पोलीस शोधतील आणि तिथेच ठोकतील, अशा शब्दांत शिंदेंनी इशारा दिला आहे.





