China vs US: “आमच्या अंतर्गत बाबींमध्ये बाहेरच्या देशाचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही,” चीनचा अमेरिकेला इशारा
China vs US : ट्रम्प यांच्या निर्णयामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो.

China vs US: पाकिस्तानमध्ये इराणसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या सर्व बंदरांना लक्ष्य करण्याचे आदेश दिलेत. अमेरिकेने काल होर्मुझची सामुद्रधुनी नाकेबंदी केली आहे.
अमेरिकन सेंट्रल कमांडनुसार इराणमध्ये येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर कडक नजर ठेवली जाणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या बंदरांना वेढा घालण्याचे आदेश दिल्यानंतर चीन आक्रमक झाला आहे. चीनने आता अमेरिकेला उघडपणे धमकी दिली आहे.
अमेरिकेने नाकेबंदी केल्यामुळे चिनी जहाजांना होर्मुझची सामुद्रधुनीतून परत जावे लागले. यामुळे चीन संतप्त झाला असून चीनने अमेरिकेला इशारा दिला की, अमेरिकेने त्याच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणेच योग्य राहील. जर अमेरिका त्याच्या मार्गात अडथळा बनला नाही, तर स्थिरता आणि शांतता टिकून राहील. China vs US
चीनचे संरक्षण मंत्री डोंग जून यांनी एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी, चीनला मध्य पूर्वेत शांतता आणि स्थैर्य हवे आहे, परंतु तो इराणसोबतच्या आपल्या ऊर्जा आणि व्यापारी करारांचा आदर करेल.
होर्मुझवर इराणचे नियंत्रण आहे आणि हा जलमार्ग चीनच्या जहाजांसाठी खुलाच राहील. आमच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणत्याही बाहेरच्या देशाचा हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही. दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप स्वीकारणार नाही,” असे स्पष्टपणे म्हंटले आहे. China vs US
चीनसाठी हा जलमार्ग महत्त्वाचा?
चीन आपल्या गरजेच्या ४० टक्के कच्चे तेल याच मार्गावरून आणतो. चीनच्या ३० टक्के एलएनजी गरजा याच जलमार्गावर अवलंबून आहेत. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो.
अमेरिकेच्या नाकेबंदीला प्रत्युत्तर म्हणून इराणने पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातातील सर्व बंदरांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्सने हाय-अलर्ट जारी केला असून या भागात लष्करी हालचाली वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.China vs US
हेही वाचा:
Skincare Tips: लिंबू- कॉफीने सौंदर्य नाही, होऊ शकतो धोका! चुकीच्या वापरामुळे त्वचेचं नुकसान वाढतंय






