“मुस्लिम बांधवांना जो पण डोळे दाखवेल, त्याला सोडणार नाही”; इफ्तार पार्टीत अजित पवारांचा इशारा

Ajit Pawar In Iftar Party | सध्या मुस्लीम बांधवाचा पवित्र रमजानचा महिना सुरू आहे. तर दुसरीकडे विविध राजकीय पक्षांकडून इफ्तार पार्ट्यांचे आयोजन देखील केले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही इफ्तारचे आयोजन करण्यात येतं.
शुक्रवारी राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी अजित पवार यांनी मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही, असे म्हंटले आहे. मागील काही काळापासून धार्मिक तेढ वाढवणारी प्रकरणं समोर येत असतानाच अजित पवार यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे.
काय म्हणाले अजित पवार?
“रमजान साजरा करणाऱ्या मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा,” असं म्हणत अजित पवारांनी भाषणाला सुरुवात केली. “रमजानचा पवित्र महिना तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि आनंद घेऊन येवो, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो. समता, त्याग, समर्पण आणि बंधुत्वाची भावना निर्माण करणारा हा पवित्र महिना आहे. रमजान केवळ एका धर्मापुरता मर्यादित नाही. रमजान आपल्याला एकता बंधुत्वाची संदेश देण्याबरोबरच गरजूंची पीडा समजण्याची प्रेरणा देतो,” असेही त्यांनी सांगितले. Ajit Pawar In Iftar Party |
#WATCH मुंबई: महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजित पवार ने अपने द्वारा आयोजित इफ्तार पार्टी में कहा, “…भारत विविधता में एकता का प्रतीक है…हमें किसी भी विभाजनकारी ताकतों के जाल में नहीं फंसना है। हमने अभी होली मनाई है, गुड़ी पड़वा और ईद आने वाली है, ये सभी त्यौहार हमें एक साथ… pic.twitter.com/71IFUtmEsz
— ANI_HindiNews (@AHindinews) March 22, 2025
“तुमचा भाऊ अजित पवार तुमच्यासोबत”
“भारत विविधतेमध्ये एकतेच प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि शाहू महाराज यांनी जातींना एकत्र घेऊन समाजाच्या उन्नतीचा मार्ग दाखवला आपल्याला हाच वारसा पुढे न्यायचा आहे. आपण नुकतीच होळी साजरी केली, आता गुढीपाडवा आणि ईद येणार आहे. सर्व सण आपण एकत्र साजरे केले पाहिजेत. कारण एकता हीच आपली खरी ताकद आहे. समाज विभाजन करणाऱ्या शक्तींच्या बोलण्यात न येता आपली ऐकताच आपली ताकद आहे हे लक्षात घ्या. तुमचा भाऊ अजित पवार तुमच्यासोबत आहे. मुस्लिम बांधवांना जो पण डोळे दाखवणार, दोन गटात भांडण लावून कायदा व्यवस्था बिघडवणार आणि कायदा आपल्या हातात घ्यायची गोष्ट करणार, तो जो कोणी असेल त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही. माफ केलं जाणार नाही,” असा इशाराही अजित पवार यांनी दिला. Ajit Pawar In Iftar Party |
अजित पवार यांनी शेअर केला फोटो
मरिन लाईन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीसाठी अजित पवारांसोबतच प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनिल तटकरेही उपस्थित होते. तसेच अजित पवार यांनी इफ्तार पार्टीचे फोटो शेअर करत “रमजाननिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित दावते-ए-इफ्तारमध्ये सहभागी झालो. या विशेष कार्यक्रमात सर्व समाज घटकाचे लोक मोठ्या आनंदानं सामील झाले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि शुभेच्छा देतो,” असं म्हंटले आहे.
रमजान निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित दावते-ए-इफ्तारमध्ये सहभागी झालो. या विशेष कार्यक्रमात सर्व समाज घटकाचे लोक मोठ्या आनंदानं सामील झाले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि शुभेच्छा देतो.
📍मरीन लाईन्स, मुंबई pic.twitter.com/kSck8pl6LB
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 21, 2025
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात धार्मिक तेढ वाढवणाऱ्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच नागपुरात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन मोठा हिंसाचार झाला. त्यामुळे सर्वच स्तरातून शांतता राखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. Ajit Pawar In Iftar Party |
हेही वाचा:
Israel Gaza war : “गाझाचा सर्वाधिक भाग आपल्या ताब्यात घ्या…”; इस्रायलने दिला हमासच्या सैन्याला इशारा





