“आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल”; बाळासाहेब थोरातांना कीर्तनकार भंडारेंची उघडपणे जीवे मारण्याची धमकी

Balasaheb Thorat | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. भंडारे यांनी थेट व्हिडीओ शेअर करत थोरात यांना धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. भंडारे यांनी ‘आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल,’ अशी धमकी दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
संगमनेरमधील घुलेवाडी येथे कीर्तन सुरू असताना कीर्तनकार भंडारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वाबद्दल बोलायला सुरुवात केली. भंडारे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या मांडणीवर उपस्थित काँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला. समोर बसलेल्या काही लोकांनी कीर्तनकारांशी हुज्जत घातली. यावेळी कीर्तनस्थळी मोठा गोंधळ उडाला होता.
कीर्तनकार भंडारे यांना रोखल्याच्या निषेधार्थ भाजप आणि शिवसेनेने धर्माच्या नावावर मोर्चा काढला. यानंतर सोमवारी रात्री हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी व्हिडिओद्वारे आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल, असे म्हणून काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना थेट मारण्याची धमकी दिली. संग्राम भंडारे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. Balasaheb Thorat |
संगमनेर मध्ये प्रवचन सांगणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी नथुरामाची भाषा?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे समाजातील विघातक वृत्तीना विरोध करतात म्हणून त्यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली जात असेल तर ते योग्य नाही.
गृहमंत्र्यांना आमचा सवाल आहे, राज्यात पोलिसांचा धाक आहे… pic.twitter.com/ugfhj2liP9
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) August 18, 2025
दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी मात्र कीर्तनकार राजकीय भाषण करत असल्याचे म्हटले. सर्वांना शांततेचे आवाहन करून धर्मपीठाचे पावित्र्य राखावे. कीर्तनकार व समाजप्रबोधकांनी थोर संतांची परंपरा जपताना मानवतेचा धर्म पुढे न्यावा याचबरोबर संगमनेरची सुसंस्कृत राजकीय परंपरा जपण्याचे आवाहनही थोरात यांनी केले होते. Balasaheb Thorat |
विजय वडेट्टीवार ट्विट –
‘काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे समाजातील विघातक वृत्तीना विरोध करतात म्हणून त्यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली जात असेल तर ते योग्य नाही. गृहमंत्र्यांना आमचा सवाल आहे, राज्यात पोलिसांचा धाक आहे की नाही? कीर्तनकार आता काँग्रेस नेत्यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी देणार, गुन्हा दाखल करण्याची धमकी देणार हे योग्य आहे का? ‘असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला.
तसेच राजकारण एक बाजूला पण उघडपणे नेत्यांना जीवे मारण्याची धमकी कीर्तनकारांनी देणे हे सर्व मर्यादा ओलांडणे आहे. महाराष्ट्रातील राजकारण इतक्या खालच्या थराला कधीच गेले नव्हते, असेही वडेट्टीवार म्हणाले. Balasaheb Thorat |
हेही वाचा :
“तामिळनाडूत अम्मा जयललितांचे राज्य मी पुन्हा आणेल…” ; राजकारणातील एन्ट्रीची शशिकला यांची मोठी घोषणा





