Rajnath Singh : आम्ही हनुमानजींच्या ‘त्या’ आदर्शांचं पालन केल; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची प्रतिक्रया

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने अचूकपणा, सतर्कता आणि माणुसकी दाखवली आहे. यामुळे मी आपल्या भारतीय सैन्याचे सर्व अधिकारी आणि सैनिकांना देशाच्यावतीने धन्यवाद देतो. सैन्याला संपूर्ण अधिकार प्रदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील आभार मानतो.
आम्ही हनुमानजींच्या त्या आदर्शांचं पालन केलं आहे, जे त्यांनी अशोकवाटीका उद्ध्वस्त करताना दाखवले होते. आम्ही केवळ त्यांनाच मारले ज्यांनी आमच्या निष्पापांचा जीव घेतला होता, अशी रोकठोक प्रतिक्रिया केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपल्या सैन्याने ऑपरेशन सिंदूर लागू करत दहशतवाद्यांचा बदला घेतला आहे.
भारताने दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणारे कॅम्प उद्ध्वस्त करत सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. आमची ही कारवाई खूप अभ्यास करुन करण्यात आली आहे. मी पुन्हा एकदा आमच्या सैन्य दलाच्या शैर्याला नमन करतो, अशी भावना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली.





