Bihar Election 2025 : “मुख्यमंत्रिपदाचा चेहरा एकत्रितपणे ठरवणार…”; निवडणुकीच्या तारखा जाहिरात होताच ‘काँग्रेस-जनता दल’मध्ये वाद सुरु

Bihar Election 2025 – बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान निश्चित केले आहे आणि १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील. पहिल्या टप्प्यातील मतदानाला एक महिन्यापेक्षा कमी वेळ शिल्लक असताना, दोन्ही प्रमुख आघाडींमधील जागावाटप अद्याप अंतिम झालेले नाही.
दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्या महाआघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारावरून वाद सुरूच आहे. राष्ट्रीय जनता दल तेजस्वी यादव यांना बिहारचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करू इच्छित आहे, परंतु काँग्रेस हे मान्य करण्यास तयार नाही. अनेक वेळा काँग्रेसने तेजस्वी यांची मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी नाकारण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस नेते उदित राज यांनी पुन्हा एकदा अशीच टिप्पणी केली आहे.
वृत्तसंस्थेशी झालेल्या संभाषणात उदित राज यांनी तेजस्वी यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले जाईल अशा अटकळीही फेटाळून लावल्या. जेव्हा उदित राज यांना विचारण्यात आले की महाआघाडी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करेल का, तेव्हा उदित राज म्हणाले की ते राजदसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतात, परंतु इंडिया आघाडीचा चेहरा एकत्रितपणे ठरवला जाईल.





