आमच्या मुलांना जीवंत पहायचय; झेलेन्स्की यांचे युरोपीय समुदायाला भावनिक आवाहन
Updated On:

लंडन – युरोपीय महासंघात भाषणासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की उभे राहताच सर्व राजदुतांनी त्यांना उभे राहून मानवंदना दिली. माझ्या देशात जे उपस्थित आहेत ते सारे जगण्यासाठी लढत आहे, असे ते म्हणाले.
आमचा लढा आमच्या भूमीसाठी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी सुरू आहे, असे सांगून झेलेन्स्की म्हणाले, आमची आमच्या मुलांना जिवंत पाहण्याची इच्छा आहे. ही इच्छा माफक आहे. आम्ही आमच्या आयुष्यासाठी लढत आहे. आमची जगण्यासाठी धडपड सुरू आहे. हीच आमची सर्वात मोठी प्रेरणा आहे.
पण आम्ही युरोपच्या समान सदस्यांसाठीही लढत आहोत. आज आम्ही प्रत्येकाला दाखवून दिले की आम्ही काय आहोत. त्यामुळे आम्हाला युरोपीय महासंघाने तातडीने सामावून घ्यावे, असे झेलेन्स्की म्हणाले.





