प्रबोधनाची सूत्रे आपल्याला दुरुस्त करावी लागणार : डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील संवादाच्या जागा शोधून, आपल्याला भविष्यात मूलतः प्रबोधनाची सूत्रे दुरुस्त करावी लागतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रचारक मंडळ भोर यांच्या पुणे शाखेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
यावेळी विचरमंचावर यशदा चे माजी संचालक रविंद्र चव्हाण, युवा उद्योजक नाशिकचे आबासाहेब थोरात, डॉ. किशोर खिल्लारे, विलास साळवे, कॉम्रेड माऊली घोणे, प्राचार्य सोमनाथ नजन इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. सबनीस आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पुढे असेही म्हणाले की, जो कल्याणकारी भूमिका बजावतो तो बुद्धाचाच भक्त असतो, मग तो कोणत्याही जाती, धर्माचा, पंथाचा असो, माणूसपणाची भूमिका घेणारा, हा बुद्धाला प्रियच आहे. वकिलांनी प्रोबोनो सर्व्हिस देणे हा सामाजिक बांधिलकीचा भाग आहे, त्यामुळे माझी या संस्थेवर कायदेशीर सल्लागार म्हणून निवड झाली, हा माझा मी बहुमान समजतो. असे प्रतिपादन ॲड. महेंद्र कवचाळे यांनी केले.
आबासाहेब थोरात यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भोर सारख्या एका खेड्यात स्थापन झालेल्या संस्थेची पुण्यासारख्या शहरात शाखा स्थापन होते, हा एक इतिहासच म्हटला पाहिजे. असे सांगून संस्थेच्या कार्याचा गौरव केला.
डॉ. रोहिदास जाधव यांनी फुले, शाहू, आंबेडकर विचार मंडळाच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट करून मंडळाच्या तालुक्यातुन सुरु झालेला प्रवास आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा पोहचला याच्या विविध कामाचा आढावा घेतला.
प्राचार्य डॉ. वृषाली रणधीर यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक करून पुणे शाखा स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला. डॉ.सुलभा पाटोळे यांनी पुणे कार्यकारिणी जाहीर केली. यात अध्यक्ष, प्राचार्य डॉ. वृषाली रणधीर, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रमोद धिवार, सुनित गजरमल, सुशील म्हसदे कार्याध्यक्ष डॉ. सुलभा पाटोळे, सचिव डॉ. संदीप कांबळे, प्रा. कल्पना रोकडे, खजिनदार डॉ. मेघना भोसले, प्रा. सुरेखा खरे यांची निवड करण्यात आली. उपस्थितांचे आभार डॉ. मेघना भोसले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. प्रमोद धिवार, सुनित गजरमल, सुरेखा खरे, डॉ. संदीप कांबळे यांनी परिश्रम घेतले.





