“आम्ही पूर्णपणे पाकिस्तानच्या पाठीशी”; तणावाच्या परिस्थितीदरम्यान चीनचे पाकड्यांना समर्थन

India VS Pakistan | भारत आणि पाकिस्तान तणावाच्या परिस्थितीदरम्यान चीनने पाकड्यांचे समर्थन केले आहे. 10 मे रोजी 5 वाजल्यापासून युद्धबंदी कराराच्या काही तासांनंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा आपल्या कृत्यांची पुनरावृत्ती केली. संध्याकाळी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले सुरू झाले होते. पण, भारताने योग्य प्रत्युत्तर दिले आणि सर्व ड्रोन हल्ले हाणून पाडले. यानंतर चीनने आपल्या परराष्ट्र मंत्रालयाद्वारे निवेदन जारी करत पाकिस्तानच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शनिवारी सांगितले की, त्यांचा देश पाकिस्तानचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य राखण्यासाठी त्यांच्यासोबत उभा राहील. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान चीनने नवे वक्तव्य जारी केले आहे. चीनने म्हटले आहे की, आम्ही पूर्णपणे पाकिस्तानच्या पाठीशी आहोत. India VS Pakistan |
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, चीनी परराष्ट्रमंत्र्यांनी हे वक्तव्य पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांच्याशी टेलिफोनवर झालेल्या संभाषणादरम्यान केले. इशाक दार यांनी यूएईचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद यांच्याशीही चर्चा केली. त्यांनी पाकिस्तान आणि भारत यांच्यातील युद्धबंदी कराराचे स्वागत केले. यासोबतच, डार यांनी तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हकान फिदान यांच्याशीही चर्चा केली आणि त्यांना या प्रदेशातील सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली.
दरम्यान, चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध आणि चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरमुळे चीनची ही भूमिका अपेक्षित होती. मात्र, यामुळे भारत-चीन संबंधांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. India VS Pakistan |
हेही वाचा :
पुणे विमानतळावर ब्लॅकआऊट! वीज पुरवठा खंडीत झाल्याने प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ, नेमकं काय घडलं?





