Sharmila Thackeray : “काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमार…”; शर्मिला ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Sharmila Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा जोरदार चर्चा होत आहे.

Sharmila Thackeray : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. इंडिया आघाडीच्या वतीने त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत असून, निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मतदार याद्यांमधील घोळावरून विरोधकांनी भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत. या सगळ्यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा जोरदार चर्चा होत आहे.
“काम आपण करतो, पण निवडून दुसरेच येतात!”
शर्मिला ठाकरे यांनी जेजुरी येथे एका दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर भाष्य केले. “काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमार यांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; आता हे बंद करायचं आहे,” असे मोठं वक्तव्य त्यांनी केले.
दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य
या कार्यक्रमात शर्मिला ठाकरे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवरही चिंता व्यक्त केली. रस्त्यावरून जाताना अनेक ठिकाणी पिके जळून गेल्याचे दिसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
या संकटातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, यासाठी आई अंबेला प्रार्थना करत असल्याचे सांगत त्यांनी उपस्थितांना जेजुरीच्या खंडेरायाला नवस बोलण्याचे आवाहन केले.
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक आक्रमक
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून इंडिया आघाडीतील नेत्यांकडून पुढील आंदोलनाची रणनीती आखली जात आहे. एसआयआर (विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण) मोहिम आणि मतदार याद्यांमधील कथित त्रुटींचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ठाकरे बंधूंचे कार्यकर्तेही रस्त्यावर
दोन दिवसांपूर्वी मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात सीजेपी, उद्धव ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासह तेजस ठाकरेही सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावरुन मोठा गोंधल निर्माण झाला होता.
Pune District: शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टांची राख; शॉर्टसर्किटमुळे पिंपळसुटीत १० एकर ऊस जळून खाक





