Wayanad Landslides: राहुल आणि प्रियंका गांधी गुरुवारी करणार वायनाडचा दौरा! स्थानिक नागरिकांची घेणार भेट
Updated On:

Wayanad Landslide | Rahul Gandhi | Priyanka Gandhi – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी उद्या (गुरूवार) केरळमधील आहेत. वायनाड जिल्ह्याला भूस्खलनाने मोठा तडाखा दिल्याच्या पार्श्वभूमीवर तो दौरा होत आहे.
भूस्खलनामुळे अनेक जण विस्थापित झाले असून त्यांना मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. त्या छावण्यांना भेट देऊन राहुल आणि प्रियंका भूस्खलनामुळे प्रभावित झालेल्यांची विचारपूस करतील. ते बुधवारीच वायनाडचा दौरा करणार होते.
मात्र, संततधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे त्यांना दौरा एक दिवसाने लांबणीवर टाकण्याचा सल्ला देण्यात आला. मागील लोकसभेत राहुल यांनी वायनाडचे प्रतिनिधित्व केले. यावेळी दोन मतदारसंघांमधून विजयी झाल्याने त्यांनी वायनाडच्या जागेचा राजीनामा दिला. आता तेथील पोटनिवडणूक प्रियंका लढवणार आहेत.





