वायनाड पोटनिवडणूक : प्रियांका गांधी ‘या’ दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार; राहुल गांधींही राहणार उपस्थित

Wayanad Bypoll Election| भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) मंगळवारी केरळमधील वायनाड लोकसभा जागेवरील पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली. येथे 13 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. येथून काँग्रेसकडून प्रियांका गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
प्रियांका गांधी या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यासाठी प्रियंका गांधी 23 ऑक्टोबर रोजी वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधीही उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी प्रियंका गांधी रोड शो करणार आहेत.
झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसोबतच 14 राज्यांतील 48 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होत आहे आणि दोन राज्यांतील लोकसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आली. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या वायनाड मतदारसंघातून प्रियांका गांधी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा काँग्रेस पक्षाने जूनमध्येच केली होती. Wayanad Bypoll Election|
काँग्रेसने घोषणा केली होती की राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघ ठेवतील आणि केरळमधील वायनाड जागा सोडतील, जिथून त्यांची बहीण प्रियंका गांधी निवडणूक लढवतील. Wayanad Bypoll Election|
नव्या हरिदास प्रियांका गांधींविरोधात निवडणूक लढणार
भारतीय जनता पक्षाने केरळमधील वायनाड लोकसभा जागेवरील पोटनिवडणुकीसाठी नव्या हरिदास यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. तर राज्याच्या सत्ताधारी एलडीएफने वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सीपीआयचे ज्येष्ठ नेते सत्यन मोकेरी यांना उमेदवारी दिली आहे.
कोझिकोड जिल्ह्यातील नादापुरम मतदारसंघातील माजी आमदार मोकेरी हे कृषी क्षेत्रातील समस्या सोडवण्याच्या कामासाठी ओळखले जातात. या जागेवर त्यांचा सामना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांच्याशी होणार आहे. Wayanad Bypoll Election|





