कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून आज दुपारी चार वाजता पाणी सोडणार ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Updated On:

सातारा : कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज संध्याकाळी ४ वाजता धरणाचे वक्र दरवाजे १ फूट ६ इंच उचलून सांडव्यावरून १०००० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. धरणात येणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन असून त्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे.
धरण पायथा विद्युत गृहामधील १०५० क्युसेक विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ११०५० क्युसेक् असेल. कोयना धरणामध्ये आज दि. २५ जुलै रोजी सकाळी ८ वाजता एकूण ७५.२६ टीएमसी म्हणजे ७१.५१ टक्के पाणीसाठा झाला आहे.
पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज वक्र दरवाजातून सांडव्यावरुन पाणी सोडण्यात येईल.





