कोयना धरणातून रात्री 12 वाजता सोडणार पाणी; नदीकाठच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा

कोयनानगर : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा एकदा दमदार पाऊस पडत असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहॆ. धरणात १६,३०० कुसेस्क पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या जलपातळीत वाढ होत आहॆ. धरणात १०४.२८ टीएमसी पाणीसाठा आहे.
पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरूच असल्याने पाणीसाठवण क्षमता संपल्याने कोयना धरणाचा पायथा वीजगृह कार्यान्वित करून सुध्दा धरणाची जलपातळी वाढत असल्याने धरणाचे ६ वक्र दरवाजे चौथ्यांदा आज रात्री १२.०० वाजता १ फुटाने वर उचलून धरणातून नदीपात्रात ११,६४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याने नदीपात्राजवळील गावांना सावधानतेचा इशारा कोयना प्रशासनाने दिला आहॆ.
धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस, पहिला आकडा २४ तासांतील पाऊस, कंसात एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये कोयनानगर येथे ३४(५४७७), नवजा येथे १२(६६८८) तर महाबळेश्वर येथे २०(६३११). पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी दमदार पाऊस कायम आहे. धरण पायथा विद्यु गृहामधून २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. रात्री बारा वाजता कोयना धरणातून नदीपात्रात एकूण ११,६४६ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येईल. कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.



