पुणे : महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पर्वती, वडगाव, लष्कर, वारजे आणि संबंधित पंपिंग स्टेशनांमध्ये येत्या गुरूवारी ( दि. २०) रोजी दिवसभर विद्युत, पंपिंग, फ्लोमीटर बसविणे, बटरफ्लाय वॉल्व्ह तपासणी, कोअर कटिंग व इतर तातडीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. या कामांमुळे खडकवासला धरणातून शहरात येणारा संपूर्ण पाणीपुरवठा गुरुवारी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ( दि. २१ ) नोव्हेंबर रोजी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. पाणी पुरवठा बंद असलेला भाग पर्वती जलशुद्धीकरण केंद्र गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर १ आणि २, लेक टाउन, शिवतेजनगर, अप्पर-लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, प्रेमनगर, आंबेडकरनगर, ढोले मळा, ठाकरे वसाहत, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, कोंढवा खुर्द (स.नं. ४२), साईबाबानगर, पद्मावती टँकर पॉईंट, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट परिसर. वडगाव जलशुद्धीकरण केंद्र परिसर हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २, आंबेडकरनगर, टिळकनगर, दाते बस स्टॉप परिसर. राजीव गांधी पंपिंग स्टेशन सच्चाई माता टाकी, संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, सुंदा माता नगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी परिसर, बालाजीनगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागर नगर भाग १ व २, राजस सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, वरखडे नगर, जुना प्रभाग ४१, येवलेवाडी परिसर. लष्कर जलकेंद्र रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, वैदुवाडी, रामनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, केशवनगर, मांजरी बु., शेवाळेवाडी, बी.टी. कवडे रस्ता परिसर कोरेगाव पार्क, साडेसतरानळी, हांडेवाडी रोड, फुरसुंगी, उरुळी देवाची, भेकराईनगर, हाय सर्व्हिस, बेकर हिल, रेसकोर्स, पुणे स्टेशन परिसर खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, ईऑन आयटी परिसर, चौधरी वस्ती, सातव वस्ती, थिटे वस्ती, तुकाराम नगर, यशवंतनगर, चंदननगर, सुनितानगर, धर्मनगर, गणेशनगर, घनलक्ष्मी, आनंद पार्क, राजश्री कॉलनी, महावीरनगर, मतेनगर, माळवाडी, मुन्नुरवार सोसायटी. रावेत–चिखली जलकेंद्र परिसर विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड परिसर. वारजे जलकेंद्र चांदणी चौक टाकी परिसर, पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड, संपूर्ण बावधन परिसर, संपूर्ण कोथरूड, कर्वेनगर, संपूर्ण वारजे, वारजे माळवाडी, काकडे सिटी, हिल व्ह्यू गार्डन, अतुलनगर, महात्मा सोसायटी, भुजबळ टाऊनशिप, रामनगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड. बाणेर गावठाण, चाकणकर मळा, सूस,बाणेर,पाषाण, औंध., गोखलेनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, डहाणूकर कॉलनी, हॅपी कॉलनी, आयडियल कॉलनी, वडारवाडी, भोसलेनगर, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, पोलीस लाईन, संगमवाडी. लॉ कॉलेज रोड, पौड रोड, औंध, बोपोडी, विद्यापीठ परिसर, खडकी, चिखलवाडी, सकाळनगर, औंधगाव परिसर.गणराज चौक, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंढवे धावडे, न्यु कोपरे.