पुणे : महापालिकेकडून येत्या शुक्रवारी ( दि. २८) रोजी चंदननगर टाकीच्या मुख्य जलवाहिनीवर तातडीचे व अत्यावश्यक स्वरूपाचे दुरुस्तीचे काम समान पाणीपुरवठा विभागाकडून घेण्यात येणार आहे. या दिवशी संपूर्ण खराडी परिसरातील बहुतांश भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी कमी दाबाने आणि उशीरा पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार असून नागारिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पाणी पुरवठा बंद असणारा भागः- संपूर्ण खराडी, चंदननगर, वडगावशेरी मधील आनंदपार्क, सुनीता नगर, गणेश नगर, स्वामी समर्थ, नामदेव नगर, मते नगर, पुण्य नगरी, महावीर नगर, मुन्नवार सोसायटी, माळवाडी आणि परिसर..