पुणे | शहराच्या काही भागांत गुरुवारी पाणी बंद

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेकडून येत्या गुरुवारी (दि. ३० मे) वडगाव जलकेंद्र व राजीव गांधी पंपिंग स्टेशन येथे विद्युत व स्थापत्य विषयक तातडीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे कात्रज, सिंहगड रस्ता तसेच धनकवडी भागांतील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या शिवाय धनकवडी येथील शिवशंकर चौक येथे कलवर्टचे काम सुरू आहे. सदर कामामध्ये अडथळा ठरणारी ७९६ मिमी व्यासाची पाइपलाइन शिफ्ट करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे येथील पंपिंग यंत्रणा बंद ठेवावी लागणार आहे. या परिसरातील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. तर, शुक्रवारी सकाळी उशिराने पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
वडगाव जलकेंद्र परिसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग-२ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर.
राजीव गांधी पंपिंग स्टेशन – सच्चाई माता टाकी, संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, सुंदामाता नगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजीनगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागरनगर भाग क्रमांक एक व दोन, राजेश सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, दत्तनगर, जुना प्रभाग 38 मधील वरखडेनगर तसेच संपूर्ण जुना प्रभाग 41 व येवलेवाडी परिसर.



