Water rationing: आठवडाभरात २० टक्के कपातीचे नियोजन- आयुक्त
Water rationing:

Water rationing: पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट गडद झाले असून, आठवडाभरात २० टक्के कपातीचे नियोजन करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. मात्र, दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले. शहरात गुरुवारची पाणीबंदी सुरू झाली आहे. त्यामुळे सुमारे १० टक्के कपात होत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
आयुक्त म्हणाले, की पाटबंधारे विभागाने २५ टक्के कपातीची गरज व्यक्त केली असली, तरी महापालिका भागनिहाय नियोजनावर भर देत आहे. पाणीकपात कशी करायची, याचा भागनिहाय विचार सुरू आहे.
काही भागांत पुरेसे पाणी मिळते, तर काही ठिकाणी आधीच नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सर्वत्र सरसकट कपात न करता सूक्ष्म पातळीवर नियोजन करणार असल्याचेही ते म्हणाले. याशिवाय, गळती रोखणे, पिण्याच्या पाण्याच्या वापरावर निर्बंध, यावरही लक्ष दिले जाणार आहे.





