Pune : खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग कमी; पावसाची स्थिती पाहून पुढील निर्णय
Updated On:

पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतली आहे. पण राज्यातील इतर ठिकाणी पावसाच्या सरी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रातमध्ये सुरू असलेला पाण्याचा विसर्ग आता कमी करण्यात आला आहे. याबाबातची माहिती पाटबंधारे विभाग पुणे यांच्यावतीने देण्यात आली आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 3762 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कमी करून आज २५ जून रोजी सकाळी 7:00 वा. 676 क्यूसेक्स करण्यात येत आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे, याची नोंद घेण्यात यावी, असे देखील उपविभागीय अभियंता मोहन भदाणे मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग स्वारगेट यांनी सांगितले आहे.





