…म्हणून पाकिस्तान संघाचे प्रशिक्षकपद अक्रमने नाकारले

लाहोर – पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याने पाकिस्तानचा प्रशिक्षक होण्यात अजिबात रस नसल्याचे सांगितले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर अक्रमने भारतातील आयपीएल स्पर्धेचा संघ कोलकाता नाईट रायडर्ससह कार्यरत झाला होता. तसेच आयपीएल संपल्यानंतर पाकिस्तान सुपर लीगमध्येही त्याने प्रशिक्षकाची भूमिका वटवली होती. मात्र, पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारणार का, या प्रश्नावर त्याने नकार व्यक्त केला.
एक प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहात असताना वर्षातील किमान 200 ते 250 दिवस संघासह राहावे लागते. क्रिकेट खेळत असताना कुटुंबाला वेळ देता येत नव्हता. मात्र, आता प्रशिक्षकपद स्वीकारले तर तेच चित्र असेल.
त्यापेक्षा कुटुंबाला वेळ देणे जास्त महत्त्वाचे आहे, म्हणूनच सध्या तरी पाकिस्तान संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यास उत्सुक नसल्याचे अक्रम म्हणाला.





