Washington Sundar Injured : टीम इंडियाला मोठा धक्का! निर्णायक सामन्यापूर्वी स्टार खेळाडू संघातून बाहेर; लॉर्ड्स वनडेआधी वाढली चिंता
Washington Sundar Injured : कार्डिफ येथील दुसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना त्याच्या पायाची स्नायू दुखावले होते. या दुखापतीमुळे तो दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीही करू शकला नव्हता.

Washington Sundar Injured Ruled Out Of 3rd ODI IND vs ENG Lords : भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना होण्यापूर्वी भारतीय संघाला एक अत्यंत मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर हा दुखापतीमुळे तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यातून अधिकृतपणे बाहेर झाला आहे. कार्डिफ येथील दुसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना त्याच्या पायाची स्नायू दुखावले होते. या दुखापतीमुळे तो दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीही करू शकला नव्हता. या मालिकेपूर्वीच हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी हे आधीच दुखापतग्रस्त होऊन बाहेर गेले असल्याने भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे.
१-१ च्या बरोबरीनंतर लॉर्ड्सवर महासंग्राम!
इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ४ गडी राखून पराभव करत ३ सामन्यांची ही मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे. भारताने पहिला सामना ६ गडी राखून जिंकला होता. आता मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे. या ‘करो या मरो’च्या सामन्यापूर्वी वॉशिंग्टन सुंदरचे बाहेर जाणे भारतासाठी चिंतेची बाब आहे. आता त्याच्या जागी प्लेइंग-११ मध्ये कुलदीप यादव, प्रिन्स यादव की अर्शदीप सिंग यांपैकी कोणाला संधी मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
धाव घेताना नक्की काय घडलं?
🚨 REPORTS 🚨
Washington Sundar is likely to be ruled out of the series decider against England due to an injury. ❌
(Source: PTI)#Cricket #India #ENGvIND pic.twitter.com/sGTSJUtuce
— Sportskeeda (@Sportskeeda) July 17, 2026
कार्डिफ वनडेत विराट कोहली बाद झाल्यानंतर सुंदर फलंदाजीला आला होता. डावाच्या ३३ व्या षटकात मिड-ऑफच्या दिशेने धाव घेताना त्याच्या उजव्या पायाला हॅमस्ट्रिंगच्या तीव्र वेदना सुरू झाल्या. मैदानावर फिजिओनी येऊन त्याच्या पायाला पट्टी बांधली. सुंदरने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला, पण पुढच्याच चेंडूवर तो साकिब महमूदचा शिकार ठरला. तो किती गंभीर दुखापतग्रस्त आहे, हे तेव्हा स्पष्ट झाले, जेव्हा तो दुसऱ्या डावात मैदानावरच उतरला नाही आणि त्याच्या जागी प्रिन्स यादवने पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून भूमिका बजावली.
कर्णधार शुबमन गिलचे मोठे वक्तव्य –
🚨 CRICKET NEWS
🏏 Washington Sundar Out of Lord’s Final: Kya Kuldeep Yadav Karenge England Ko Dher?
📖 Read full news:https://t.co/n2LFVKKMrz#Washington #Sundar #TheGuruGyan #CricketNews pic.twitter.com/usRmWZzQGA
— Guru Gyan (@TheGuruGyanAI) July 17, 2026
सुंदरच्या दुखापतीवर बोलताना कर्णधार शुबमन गिल म्हणाला, “सुंदर हा आमच्या संघाचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. तो अचानक बाहेर गेल्यामुळे आम्हाला संपूर्ण सामन्यात केवळ ५ मुख्य गोलंदाजांसह खेळावे लागले. जेव्हा एखादा मुख्य खेळाडू सामना सोडून जातो, तेव्हा रणनीती बदलावी लागते. यामुळे आमचा गोलंदाजीतील मोमेंटम नक्कीच बिघडला.”





