अमेरिकेत भीषण अपघात ! प्रवासी विमान लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडकले ; वॉशिंग्टन विमानतळ बंद

Washington flight crash । अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीजवळील रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळ (डीसीए) जवळ एक भीषण विमान अपघात झाला आहे. पीएसए एअरलाइन्सचे एक प्रवासी विमान हवेत असताना लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडकल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातानंतर विमान नदीत पडले असल्याचे सांगण्यात येत आहे.
एअरलाइन्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात ४ क्रू मेंबर्ससह ६४ प्रवासी होते. पीएसए एअरलाइन्स ही अमेरिकन एअरलाइन्सची उपकंपनी आहे. अपघातग्रस्त विमानात ६५ प्रवाशांची बसण्याची क्षमता होती. तर दुसरीकडे एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर वॉशिंग्टन डीसी विमानतळावरील सर्व टेकऑफ आणि लँडिंग थांबवण्यात आले आहे. याच मुद्द्यावर अमेरिकन सिनेटर टेड क्रूझ यांनी ट्विट केले की, अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाला. तथापि, मृतांची नेमकी संख्या अद्याप निश्चित झालेली नाही.
अमेरिकन एअरलाइन्सकडून निवेदनात जारी Washington flight crash ।
अमेरिकन एअरलाइन्सने या अपघातासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी,”आम्हाला या प्रकरणाची माहिती आहे, ज्यामध्ये PSA द्वारे चालवले जाणारे अमेरिकन ईगल फ्लाइट 5342 क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दल अधिक माहिती नंतर दिली जाईल” असे म्हटले गेले आहे.
‼️Mass casualty event: Washington DC
Searches underway as an American Airlines plane has crashed into a helicopter while landing at Reagan Airport Washington D.C.
— JB 🇺🇸 (@BarkosBite) January 30, 2025
अमेरिकन एअरलाइन्स विमान अपघात Washington flight crash ।
बीएनओच्या अहवालानुसार, अमेरिकन एअरलाइन्सचे विमान क्रमांक ५३४२ एका लष्करी हेलिकॉप्टरशी धडकले, त्यानंतर दोघेही पोटोमॅक नदीत पडले. यावेळी विमानात ६४ आणि हेलिकॉप्टरमध्ये ३ जण होते. अपघातानंतर ४ जणांना वाचवण्यात आले आहे.
दक्षिण कोरिया विमान अपघात
अमेरिकेच्या विमान अपघातापूर्वी, डिसेंबर महिन्यात दक्षिण कोरियामध्ये एक धोकादायक विमान अपघात झाला होता, ज्यामध्ये विमानातील १८१ पैकी १७९ जणांचा मृत्यू झाला होता. अपघातग्रस्त जेजू एअर बोईंग ७३७-८०० हे विमान बँकॉकहून दक्षिण कोरियाला येत होते. विमानातील बहुतेक लोक ख्रिसमसच्या सुट्ट्या साजरे करण्यासाठी जात होते.





