Washim News : वाशिममध्ये विहिरीचे बांधकाम करताना 2 कामगारांचा मृत्यू
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विहिरीचा कठडा (Washim News) कोसळून चार मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता वाशिम जिल्ह्यातूनही अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

Washim News : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विहिरीचा कठडा (Washim News) कोसळून चार मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता वाशिम जिल्ह्यातूनही अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील जवळा कुंभार शेतशिवारात नवीन विहिरीचे बांधकाम सुरू असताना दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण गावात (Washim News) शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हळदीचे पीक वाचवण्यासाठी संबंधित शेतमालकाने आपल्या शेतात नवीन विहीर खोदण्याचे आणि बांधण्याचे काम सुरू केले होते. विहिरीच्या कठड्याच्या बांधकामासाठी बाजूने मुरूम टाकण्याचे काम सुरू असताना अचानक मातीचा भाग ढासळला.
यावेळी तिथे काम करत असलेल्या एका मजुराचा तोल जाऊन तो थेट खोल विहिरीत कोसळला. आपल्या सहका-याला पाण्यात बुडताना पाहून दुस-या मजुराने क्षणाचाही विलंब न करता त्याला वाचवण्यासाठी विहिरीत (Washim News) उडी घेतली. मात्र, विहीर खूप खोल असल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही दुर्दैवाने पाण्यात बुडून मृत्यू झाला.




