Pimpri | वारकऱ्यांच्या रिक्षाचा बोरघाटात अपघात
Updated On:

खालापूर, – परतीच्या मार्गावर असलेल्या देवरुंग (ता.भिवंडी) येथील वारकऱ्यांच्या रिक्षाचा बोरघाटात अपघात झाला. अपघातात रिक्षातील पाचही वारकरी भाविक जखमी झाले.
उत्पत्ति एकादशी निमित्त हे सर्वजण आळंदी यात्रेसाठी गेले होते. देवदर्शन करुन माघारी परतत असताना त्यांच्या रिक्षाचा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
रिक्षात अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बोरघाटातील तीव्र उतारावर खिंडीमध्ये रिक्षाला योग्य वळण घेता न आल्याने रिक्षा समोरील डोंगराला धडकल्याने हा अपघात झाला.
टॅग्स:





