Wardha News : वर्धा हादरलं ! अल्पवयीन मुलाकडून काका व चुलत भावाची हत्या
वर्धा जिल्ह्यात (Wardha News) रविवारी जमिनीच्या वादाने हिंसक वळण घेतले. लग्नाच्या वरातीत एका अल्पवयीन मुलाने आपला काका आणि चुलत भावाची भोसकून हत्या केल्याचा आरोप आहे.

Wardha News : वर्धा जिल्ह्यात (Wardha News) रविवारी जमिनीच्या वादाने हिंसक वळण घेतले. लग्नाच्या वरातीत एका अल्पवयीन मुलाने आपला काका आणि चुलत भावाची भोसकून हत्या केल्याचा आरोप आहे.
बारबडी गावात सकाळी १०.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. माहीतीनुसार, लग्नाच्या वरातीत अल्पवयीन मुलगा, त्याचे काका (५०) आणि चुलत भाऊ (२४) यांच्यात वाद झाला.
या वादातून (Wardha News) संतापाच्या भरात आरोपीने चाकूने त्यांच्यावर निर्घृण हल्ला केला, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या कुटुंबात जमिनीवरून जुना वाद सुरू होता. वरकरणी पाहता हा हल्ला त्याच वादाचा परिणाम असल्याचे दिसून येत आहे.
आम्हाला घटनेची माहिती मिळताच आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली होती.
दरम्यान, भलमे परिवारात काही दिवसापासून संपत्तीचा वाद (Wardha News) सुरू होता. आठ महिन्यापूर्वी देखील अल्पवयीन आरोपी आणि मृतकांमध्ये याच कारणातून भांडण झाले असल्याची माहिती आहे. त्यात दोन्ही बाजुने गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर, दोघांना मारण्याचा कट अल्पवयीन आरोपीकडून आखला जात होता.
त्यासाठी त्याने ऑनलाईन चाकू देखील मागविल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन आरोपी नातेवाईकाच्या लग्नात आला, त्याने संधी साधून वरात सेवाग्राम मार्गावर हनुमान मंदिराजवळ पोहचताच काका आणि चुलत भावावर चाकूने सपासप वार केले.






