महायुतीत युद्ध चव्हाट्यावर.! आमदार किशोर पाटलांच्या ‘त्या’ टीकेवर भाजप नेत्यांकडून पलटवार
Updated On:

पाचोरा : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा मतदारसंघात महायुतीमधील (भाजप-शिवसेना शिंदे गट) अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून, शिवसेनेचे (शिंदे गट) स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी थेट मित्रपक्ष भाजपवर निधी वाटपावरून केलेल्या टीकेमुळे महायुतीत ‘मेळावा युद्ध’ भडकले आहे.
पाटील यांच्या सडेतोड विधानानंतर भाजपचे आजी-माजी नेत्यांनी त्यांच्या टीकेचा जोरदार समाचार घेत युतीमधील तणाव चव्हाट्यावर आणला आहे. आमदार किशोर पाटील यांनी एका जाहीर मेळाव्यात बोलताना भाजपला लक्ष्य केले. त्यांनी थेट आरोप केला की, “महायुतीच्या काळात या आमदारांना एक वर्षात एक फुटकी कवडी सुद्धा मिळालेली नाही.





