हृतिक रोशन-ज्युनियर एनटीआरच्या ‘वॉर २’ चित्रपटाच्या कमाईत घसरण

War 2 Box Office Collection । अभिनेता हृतिक रोशन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘वॉर २’ चित्रपट १४ ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. या चित्रपटाच्या कमाईत शनिवारी मोठी घसरण झाली.
‘वॉर २’ने पहिल्या दिवशी हिंदी, तेलुगू व तमिळ या तिन्ही भाषांमध्ये ५२ कोटी रुपये कमावले. १५ ऑगस्टला ५७.३५ कोटी रुपये कमावले. तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईला मोठा धक्का बसला. ‘वॉर २’ने शनिवारी देशात एकूण ३३.२५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले.
‘सॅकनिल्क’च्या मते, तीन दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची एकूण कमाई १४२.६० कोटी रुपये झाली आहे. तिसऱ्या दिवशी या स्पाय अॅक्शन चित्रपटाने हिंदी आवृत्तीत २६ कोटी रुपये कमावले आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर २’चे बजेट ४०० कोटी रुपये आहे. War 2 Box Office Collection ।
‘कुली’ चित्रपटाने ‘वॉर २’ला टाकले मागे
दुसरीकडे रजनीकांत, श्रुती हासन, नागार्जुन, सत्यराज स्टारर ‘कुली’ चित्रपटाने ‘वॉर २’ला मागे टाकले आहे. पहिल्या दिवशी ‘कुली’ने ६५ कोटींची कमाई करून हृतिक-एनटीआरच्या चित्रपटाला मागे टाकले. वॉर २ मध्ये कियारा अडवाणी देखील मुख्यभूमिकेत आहे.War 2 Box Office Collection ।
दरम्यान, २०१९ साली १७० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या वॉर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अंदाजे ४७५ कोटी रुपये कमावले होते. हा चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला होता. यामध्ये अभिनेत्री वाणी कपूर मुख्य भूमिकेत झळकली होती. War 2 Box Office Collection ।
हेही वाचा :
Ajit Pawar : लाडकी बहीणनंतर आता लाडकी सुनबाई योजना? अजित पवार म्हणाले, सूत्रांच्या माहितीनुसार…





