वॅार 2 : 500 कलाकारांचा डान्स सिक्वल शूट होणार; महेश बाबूचेही असणार विशेष योगदान, काय आहे चित्रपटाची नवी माहिती? वाचा…

वॅार २ या अॅक्शनपॅक्ट चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाशीसंबंधित प्रत्येक माहिती जाणून घेण्यात प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे. आता या चित्रपटासंबंधी एक मोठी अपडेट समोर आली आहे. चित्रपटाच्या डान्स शूटिंगला सुरूवात झाली आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबत तब्बल ५०० हून अधिक डान्सर्स या डान्समध्ये सहभागी होणार आहेत. मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये हा डान्स सीक्वेल शूट केला जाणार आहे. कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस यांच्या मार्गदर्शनाखाली हे गाणे सहा दिवसांत चित्रित केले जाईल, अशी माहिती मिळत आहे.
ज्युनियर एनटीआर आणि हृतिक रोशन यांच्याशिवाय दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू देखील या चित्रपटात महत्त्वाचा भाग असणार आहे. तो या चित्रपटात काम करणार नसून ज्युनिअर एनटीआरचा आवाज बनणार असल्याचे सांगण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, महेश बाबू ‘वॉर 2’ चित्रपटाच्या तेलुगू व्हर्जनसाठी ज्यूनिअर एनटीआरचा आवाज बनणार आहे. यामुळे प्रेक्षकांमध्ये वॅार २ ची मोठी क्रेझ आहे.
हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरचे चाहते आधीच ‘वॉर 2’ बद्दल खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात कियारा अडवाणीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्स करत असून चित्रपटाला प्रीतमने संगीत दिले आहे. वॅार २ चे दिग्दर्शन आयान मुखर्जी करणार आहेत. हा चित्रपट १५ अॅागस्ट २०२५ म्हणजेच स्वातंत्र्यदिनी देशभरात रिलीज करण्यात येणार आहे. यामुळे आता चित्रपटाचा ट्रेलर कधी येणार याविषयी प्रेक्षक उत्सुक आहेत.





