Sitara Ghattamaneni : महेश बाबूची लेक सिताराचा जलवा; खास फॅशन करत रॅम्प वॉकने वेधले साऱ्यांचे लक्ष

Sitara Ghattamaneni : साउथ सुपरस्टार महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची मुलगी सितारा घट्टामनेनी पुन्हा एकदा तिच्या सुंदर लुकमुळे चर्चेत आली आहे.
सिताराला आता फॅशन आयकॉन म्हणून ओळखले जात आहे. सध्या तिचा ज्वेलरी एक्झिबिशनमधील एक व्हिडीओ व्हायरल होत असून, ज्यात ती रॅम्प वॉक करताना दिसत आहे.
एका लक्झरी ज्वेलरी प्रदर्शनाच्या लॉन्च इव्हेंटमध्ये १३ वर्षांच्या सिताराने आपल्या उपस्थितीने आणि खास फॅशनमुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय आई नम्रतासोबत सिताराचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
आई-मुलीची जोडी पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर चाहते, कलाकार भरभरून कमेंट्स करत आहे. तिच्या सौंदर्याचे, स्टाइलचे आणि फॅशनचे कौतुक करत आहेत.
सोशल मीडिया युजर्स तिला “फ्युचर सुपरस्टार” आणि “यंग फॅशनिस्टा” म्हणत आहे, उपाध्या देत आहेत. ही पहिलीच वेळ नाही की सिताराने चर्चेत स्थान मिळवले आहे. याआधीही तिने मोठ्या ब्रँड्ससोबत काम केले आहे, त्यावेळी देखील तिच्या फॅशन सेन्सचे कौतुक झाले होते.
हेही वाचा :




