वक्फ बोर्डाच्या JPC बैठकीत गोंधळ: TMC खासदाराने टेबलावर काचेची बाटली फोडली, बोटाला दुखापत

Waqf Board Bill: वक्फ बोर्डासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत मंगळवारी (२२ ऑक्टोबर) मोठा गदारोळ झाला. या गदारोळात तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी इतके संतापले की, त्यांनी टेबलावर काचेची पाण्याची बाटली आपटली. त्यानंतर ती जेपीसीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्या दिशेने भिरकावली. यात पाल बचावले. मात्र, यादरम्यान स्वत: कल्याण बॅनर्जी जखमी झाले, त्यांच्या बोटाला दुखापत झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान निवृत्त न्यायमूर्ती गांगुली आणि कल्याण बॅनर्जी यांच्यात जोरदार वादावादी झाली आणि त्यानंतर कल्याण बॅनर्जी यांनी रागाने पाण्याची बाटली टेबलावर इतकी आपटली की त्यांच्या स्वत: च्या हाताला दुखापत झाली. दुखापतीमुळे त्यांच्या हाताला टाके घालावे लागले. यानंतर जेपीसी अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी हे प्रकरण कसेतरी हाताळले.
Scuffle broke out during the Waqf JPC meeting in Parliament. According to eyewitnesses to the incident, TMC MP Kalyan Banerjee picked up a glass water bottle kept there and hit it on the table and hurt himself by accident: Sources
More details awaited pic.twitter.com/vMOkdZKwKP
— ANI (@ANI) October 22, 2024
हातात चार टाके –
जखमी झाल्यानंतर कल्याण बॅनर्जी यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले, तेथे त्यांच्या हाताला चार टाकेही पडले. वैद्यकीय मदतीनंतर, एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये कल्याण बॅनर्जी यांना AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि आम आदमी पार्टी (AAP) नेते संजय सिंह यांनी पुन्हा बैठकीच्या खोलीत नेले असल्याचे दिसत आहे.
#WATCH | Delhi: Meeting of the JPC (Joint Parliamentary Committee) on the Waqf Bill begins at the Parliament Annexe. It was halted briefly after a scuffle broke out during the meeting.
According to eyewitnesses to the incident, TMC MP Kalyan Banerjee picked up a glass water… pic.twitter.com/vTR7xMwOb5
— ANI (@ANI) October 22, 2024
बॅनर्जी यांना बैठकीत बोलायचे होते –
जेपीसीच्या बैठकीत ओडिशा समूहासोबत झालेल्या बैठकीत हा वाद झाला. बैठकीत जस्टिस इन रिॲलिटी, कटक, ओडिशा आणि पंचसखा प्रचार बानी मंडळी, कटक, ओडिशा यांनी आपल्या सूचना मांडल्या. या बैठकीत निवृत्त न्यायमूर्ती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांसह अनेक मान्यवर उपस्थित होते, परंतु कल्याण बॅनर्जी यांच्याशी यापूर्वी तीनदा बोलणे झाले असतानाही त्यांना आपले म्हणणे मांडायचे होते आणि सादरीकरणादरम्यान त्यांना दुसरी संधी मिळण्याची इच्छा होती, त्याबाबत भाजपचे खासदार अभिजीत गंगोपाध्याय यांनी आक्षेप घेतला.
अपमानास्पद भाषा –
अभिजित गंगोपाध्याय यांच्याविरोधात कल्याण बॅनर्जी यांनी अपशब्द वापरल्याचे सूत्रांनी सांगितले, मात्र दोन्ही बाजूंनी अपशब्द वापरल्याचा दावा केला आहे. दरम्यान, कल्याण बॅनर्जी यांनी तिथे ठेवलेली काचेची पाण्याची बाटली उचलून टेबलावर फेकली आणि स्वत:ला दुखापत केली. यानंतर त्यांनी तुटलेली बाटली सभापतींच्या दिशेने फेकली. या घटनेमुळे सभा काही काळासाठी तहकूब करण्यात आली. बॅनर्जी यांना या बैठकीतून एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले.





