वक्फ विधेयकावर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आक्रमक ; १३ मार्चपासून जंतरमंतरवर आंदोलन करण्याची घोषणा

Waqf Amendment Bill । अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा १० मार्चपासून सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत, वक्फ विधेयकाबाबत पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. त्यातच अनेक मुस्लिम समुदाय त्याला विरोध करत आहेत. दरम्यान, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आक्रमक भूमिकेत असल्याचे समोर आले आहे. त्यातच ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष अर्शद मदनी यांनी १३ मार्चपासून दिल्लीतील जंतर-मंतरवर मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना अर्शद मदनी यांनी याविषयी माहिती दिली. त्यांनी याविषयी बोलताना, ‘वक्फ हा आमचा धार्मिक विषय आहे. राजकीय पक्ष वक्फ विधेयकात किरकोळ सुधारणा करून ते मांडण्याची तयारी करत आहेत. आम्ही याला विरोध करत आहोत. मला वाटतं इस्लामविरोधी पक्षांना हे विधेयक आणायचं आहे. बेजबाबदार पक्षांना वाटते की मुस्लिमांना या देशात राहू देऊ नये, आम्ही याला विरोध करतो.
‘देशात कायद्याचे महत्त्व नाहीसे झाले’ Waqf Amendment Bill ।
अर्शद मदनी म्हणाले, ‘१९९१ च्या पूजा कायद्यानुसार, १९४७ नंतर गोष्टी जशा आहेत तशाच राहिल्या पाहिजेत. मुस्लिमविरोधी पक्षांनी हे पाळले नाही. वाराणसीतील मशीद किंवा इतर ठिकाणच्या मशिदी या कायद्याच्या कक्षेत ठेवाव्यात पण असे दिसते की देशाच्या कायद्याला काही महत्त्व नाही.
१३ मार्चपासून संपाची घोषणा Waqf Amendment Bill ।
अर्शद मदनी म्हणाले, ‘१० मार्चपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात वक्फ विधेयक मंजूर होण्याची शक्यता असल्याने, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डाने १३ मार्चपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे निषेध करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम आणि इतरांना सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले आहे. हे विधेयक सभागृहात सादर होताच विरोधी पक्षांनी प्रचंड गोंधळ घातला.
हेही वाचा
महिलांनंतर दिल्ली सरकार गिग कामगारांना भेट देण्याच्या तयारीत ; राज्य सरकारकडून एक समिती गठीत
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांच्यात आज होणार बैठक ; ‘या’ ३ मुद्द्यांवर होणार चर्चा?





