Yami Gautam : IAS अधिकारी व्हायचं होतं, पण अभिनयाची वाट निवडली; ‘विकी डोनर’पासून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत, असा होता प्रवास
Yami Gautam : यामीचा प्रवास नेमका कसा होता याविषयी जाणून घेऊयात....

Yami Gautam : १८ जुलैला म्हणजेच काल ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नवी दिल्लीत करण्यात आली. यंदा ‘आर्टिकल ३७०’ सिनेमाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म, तर याच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार यामी गौतमला जाहीर झाला. अभिनेत्री यामी गौतमने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिने करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. त्यानंतर तिने मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली. ‘विकी डोनर’ या सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर यामीने कधी मागे वळून पाहिलचं नाही. आतापर्यंत केलेल्या कामाची चोख पोचपावती तिला मिळाली आहे. यामीचा प्रवास नेमका कसा होता याविषयी जाणून घेऊयात….
सुरुवातीचे दिवस
अभिनेत्री यामी गौतम हिचा जन्म २८ नोव्हेंबर १९८८ रोजी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात झाला. तिचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण येथचं झालं. खरंतर यामीला आयएएस अधिकारी व्हायचं होतं, त्यासाठी तिने सुरुवातही केली होती. मात्र, अनपेक्षितपण तिने अभिनय करण्याचा मार्ग निवडला. तिने मुंबईत येऊन आपल्या करिअरला सुरुवात केली. सुरुवातीचे दिवस तिच्यासाठी खडतर गेले. काम मिळत नव्हते. मोठ्या संकटांचा आणि आव्हानांचा सामना यामीला सुरुवातीच्या दिवसांमध्ये करावा लागला.
छोट्या पडद्यावर मिळाली संधी
सुरुवातीच्या काळात यामीने अनेक अॅड फिल्म्स केल्या. तिची सगळ्यात जास्त लोकप्रिय अॅड फेअर अॅन्ड लव्हलीची होती. यानंतर तिने छोट्या पडद्यावर आगमन केले. ‘चांद के पार चलो’ या टीव्ही मालिकेत ती दिसली होती. २००८ सालची ही मालिका. ‘उल्लास उठास’ या कन्नड सिनेमातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. २००९ मध्ये तिचा हा कन्नड सिनेमा प्रदर्शित झाला होता. यानंतर यामी गौतमने पंजाबी आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं.
Aaditya Thackeray : लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर आदित्य ठाकरे भडकले; म्हणाले, “आम्ही आधीपासूनच..”
‘विकी डोनर’ मुळे मिळाली ओळख
मात्र, तिला खरी ओळख मिळाली ती ‘विकी डोनर’ या सिनेमामुळे. या सिनेमामध्ये तिने अभिनेता आयुष्यमान खुरानासोबत स्क्रिन शेअर केली. या सिनेमाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. हा सिनेमा २०१२ मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शक सुजित सरकार यांनी केलं होतं. यानंतर यामी गौतमने बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले.
अनेक हिट सिनेमांत काम
‘बदलापूर’, ‘काबिल’, ‘उरी’ आणि ‘बाला’ यासह अनेक हिट सिनेमांत यामीने अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली. यामी गौतमला सामाजिक कार्यात खूप रस आहे. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी ती दीर्घकाळापासून काम करत आहेत. ती सतत सोशल मीडियावर सक्रिय असते. ती अनेकदा योगा करतानाचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
आदित्य धरसोबत सात फेरे
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री म्हणून यामीकडे पाहिले जाते. यामी गौतमने दिग्दर्शक आदित्य धरसोबत सात फेर घेत विवाह केला. यामीचं बाकीच्या सेलिब्रिटींप्रमाणे लग्न झालं नाही तर तिच्या कुटुंबातील आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने हिमाचलमधील तिच्या घरी विवाह झाला.
गुप्तहेर अधिकाऱ्याची भूमिका
‘आर्टिकल ३७०’ या सिनेमात यामी गौतमने ‘जुनी हक्सर’ (Zooni Haksar) नावाच्या एका धाडसी NIA (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) गुप्तहेर अधिकाऱ्याची मुख्य भूमिका साकारली आहे. या भूमिकेत ती काश्मीरमधील फुटीरतावादी कारवाया आणि दहशतवाद मोडून काढण्यासाठी एका गुप्त मिशनवर काम करते. याच भूमिकेसाठी तिला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
Maharashtra Weather: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी





