Wang Yi : भारत-चीनने एकमेकांच्या हिताचा आदर करणे अपरिहार्य; चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केले मत
भारत आणि चीनने एकमेकांच्या महत्वाच्या मुख्य हितसंबंधांचा आदर करणे अपरिहार्य आहे, असे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी (Wang Yi) यांनी म्हटले आहे.

Wang Yi : भारत आणि चीनने एकमेकांच्या महत्वाच्या मुख्य हितसंबंधांचा आदर करणे अपरिहार्य आहे, असे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी (Wang Yi) यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांनी चर्चेद्वारे मिळवलेले महत्वाच्या एकमताची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस कृती करणे देखील तितकेच अपरिहार्य आहे, असेही वांग यी यांनी म्हटले आहे.
ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा विषयक परिषदेसाठी वांग यी नवी दिल्लीमध्ये आले आहेत. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबरोबर सोमवारी त्यांची चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी हे (Wang Yi) मत मांडले. डोवाल आणि वांग यी यांच्यातल्या चर्चेमध्ये द्विपक्षीय संबंध आणि संबंध सामान्य करण्याच्या प्रक्रियेतील प्रगतीविषयी देखील चर्चा झाली.
भारत आणि चीनमधील सीमामुद्द्यावर चर्चा करण्यासाठी डोवाल आणि वांग यी हे दोघेही आपापल्या देशांचे विशेष प्रतिनिधी आहेत. वांग यी हे चीनच्या सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या पॉलिटिकल ब्युरोचे सदस्य आणि ऑफिस ऑफ सेंट्रल कमिशन फॉर फॉरेन अफेअर्सचे संचालक देखील आहेत. भारत हा चीनचा एक महत्त्वाचा शेजारी देश असून, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुधारण्याच्या आणि पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर आहेत.
चीन आणि भारत हे प्रतिस्पर्धी नसून भागीदार आहेत, यावर दोन्ही देशांचे नेते (Wang Yi) सहमत झाले. अशाप्रकारे दोन्ही बाजूंमध्ये सर्वात महत्त्वाची धोरणात्मक सहमती झाली आहे. त्यामुळे चीन-भारत संबंधांच्या सुदृढ आणि स्थिर विकासासाठी एक महत्त्वपूर्ण चालना आणि धोरणात्मक हमी मिळाली असल्याचेही वांग यांनी सांगितले.
दोन्ही देशांनी केवळ दीर्घकालीन द्विपक्षीय भागीदारीकडे बघता कामा नये. तर जागतिक दृष्टिकोनातून दोन्ही देशांमधील सहकार्याला प्रोत्साहन द्यायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. स्थिर, अंदाज बांधता येण्याजोगे आणि विधायक द्विपक्षीय संबंधांनी दोन्ही बाजूंमध्ये विश्वास निर्माण करण्यास आणि उत्तम सामंजस्य वाढवण्यास हातभार लावला असल्यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांनी यावर जोर दिला.






