Wamiqa Gabbi : फ्लोरल ड्रेस, फ्रेश लूक आणि गोंडस स्मित हास्य…; ‘वामिका’च्या सौंदर्याला शब्दच अपुरे!

Wamiqa Gabbi – शाहिद कपूर आणि करिना कपूरचा ‘जब वी मेट’ हा सिनेमा प्रचंड गाजला. आजही प्रेक्षकांच्या ओठावर या सिनेमाचं नाव असतं. प्रत्येक चाहत्यांच्या आवडत्या सिनेमांच्या यादीत हा सिनेमा असतोच. ‘जब वी मेट’ या सिनेमामध्ये शाहिद कपूर ‘आदित्य’ तर करिना कपूर ‘गीत’च्या मुख्य भूमिकेत आहेत.
मात्र त्यांच्या मुख्य भूमिका तर आहेतच पण त्याचबरोबर तरुण अरोरा, सौम्या टंडन, दारा सिंग यांसारख्या अनेक कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर या सिनेमामध्ये ‘वामिका गब्बी’ या अभिनेत्रीनेही करिनाच्या बहिणीची भूमिका साकारलीये.
‘जब वी मेट’ या सिनेमामध्ये वामिका गब्बीने ‘गीत’च्या म्हणजेच करिना कपूरच्या लहान चुलत बहिणीची भूमिका साकारली होती. या सिनेमात वामिकाचे फार कमी संवाद होते.
त्यानंतर वामिकाने फक्त हिंदीच नव्हे तर पंजाबी, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये वामिकाने महत्वाची भूमिका केली आहे.
अभिनेत्री वामिका गब्बीने अत्यंत कमी कालावधीमध्ये स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केलीये. आज तीच नाव कलाविश्वात आघाडीच्या नायिकांमध्ये सामील झालं आहे.
‘वामिका गब्बी’ ही अभिनेत्री तिच्या नैसर्गिक सौंदर्य आणि मोहक अंदाजामुळे ओळखली जाते. तिच्या चेहऱ्यावरील शांत आणि प्रसन्न भाव तिच्या मोहकतेत भर घालतो. आणि म्हणूनच फॅन्स तिच्या प्रेमात वेडे होतात.
तिच्या कपड्यांची निवडही तिच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे सोबर असते. पारंपरिक असो वा आधुनिक, प्रत्येक पोशाखात त्या सहज आणि सुंदर दिसते. वामिकाचे स्मित हास्य खूप आकर्षक आहे आणि ते तिच्या लूकमध्ये एक खास जादू निर्माण करते. त्यांच्या डोळ्यांतील बोलके भाव तिच्या सौंदर्यात आणखी भर घालतात.
सोशल मीडियावर वामिका अनेकदा आपले साधे आणि सुंदर फोटो शेअर करत असते, तिच्या चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो. वामिकाचा फ्लोरल प्रिंटेड लेहंग्यातील वेड लावणारा लूक सध्या चांगलाच चर्चेत आहेत.
तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. तिच्या साध्या पण प्रभावी सौंदर्यामुळे वामिका गब्बी अनेक चाहत्यांच्या मनात एक खास स्थान निर्माण करते.





