Walmik Karad : तीन आठवड्यापासून वाल्मिक कराड कुठं फरार होता? CID अधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितलं….

Walmik Karad : मस्साजोग येथे झालेल्या सरपंच हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला आहे. या निर्घृण हत्येचे पडसाद राज्यभरात उमटले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात आली आहे. अशातच आज या प्रकरणात एक महत्वाची घडामोड घडली असून या गुन्ह्याचा कथित मास्टर माईंड वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला आहे.
या गुन्ह्यामध्ये नाव आल्यानंतर कराड फरार झाला होता, अखेर आज त्याला उपरती आली असून तो स्वतःच सीआयडीला शरण आला आहे. संपूर्ण राज्यात चर्चा होत असलेला वाल्मिक कराड इतके दिवस नेमका कुठं होता? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
गेल्या तीन आठवड्यापासून वाल्मिक कराड फरार होता. तो आज सकाळी साडे बाराच्या सुमारास स्वत: सीआयडी मुख्यालयात हजर झाला. सीआयडी पुणे पथकाने त्याला ताब्यात घेतलं आहे. वाल्मीक कराडची जुजबी चौकशी केल्यानंतर तो इतके दिवस कुठं होता याचा खुलासा झाला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीचे डीवायएसपी करत आहेत. या गुन्ह्याच्या तपासासाठी वाल्मीक कराडला त्यांच्या ताब्यात देणार असल्याचं सीआयडी अधिकारी सारंग आवाड यांनी सांगितलं. यावेळी सीआयडी अधिकाऱ्यांना वाल्मीक कराड इतके दिवस कुठे होता? तो कुठून आला याबद्दल विचारण्यात आले.
मात्र सीआयडी अधिकाऱ्यांनी यावर काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, वाल्मीक कराडला टीमसह ताब्यात देण्यासाठी बीडला रवाना केलं असल्याचं सारंग आवाड यांनी सांगितलं.
ही बातमी नक्की वाचा…
मुंडेंचा घरगडी ते बीडचा मास्टर माईंड! जाणून घ्या वाल्मिक कराड कसा घडला…





