Watermelon Death Case : ‘या’ दोन अहवालांची प्रतिक्षा! कलिंगड खाऊन मृत्यू प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
Watermelon Death Case : मुंबईतील पायधूनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या मृत्यू प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Watermelon Death Case : 26 एप्रिल या दिवशी मुंबईतील पायधूनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील आई वडिल आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुली अशे चारही जण कलिंगड खाल्यानंतर दगावले. या संशयास्पद मृत्यूनंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली.
कलिंगड खाण्याअगोदर या कुटुंबातील सदस्यांनी बिर्याणी खाल्ली होती. यातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र,अजूनही या सदस्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. फॅारेन्सिक टीमकडून डोकाडिया कुटुंबातील घरातील त्यांनी खालेल्या कलिंगडाचे अर्थवट तुकडे, बिर्याणी आणि भांडी अशा वस्तूंची तपासणी करण्यात आली होती.
पण तरीही या रहस्यमय मृत्यूचा उलघडा झालेला नाही. त्यामुळे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. अशातच या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात कलिंगड खाल्यानंतर चारही सदस्यांना विषबाधा झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात होता.
मात्र, प्राथमिक तपासात विषबाधा नाकारण्यात आली असून, मृतांच्या शरीरात विषारी रसायनांचे अंश आढळले आहेत. फॉरेन्सिक अहवालातही याची पुष्टी झाली आहे.
मायक्रोबायोलॉजी आणि पॅथॉलॉजी अहवालांची प्रतीक्षा
26 एप्रिल रोजी बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उलट्या जुलाब असा त्रास चारही सदस्यांना व्हायला सुरूवात झाली. त्यानंतर यातील काहींना आधी इतर रुग्णालयात उपचार देऊन नंतर जेजे रुग्णालयात हलवण्यात आले.
मात्र, सर्वांचा मृत्यू झाला. आता मायक्रोबायोलॉजी आणि पॅथॉलॉजी या दोन महत्वाच्या अहवालांची प्रतीक्षा असून, त्यावरून मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच मुंबईतील जेजे रुग्णालय येथे डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणी ‘डेथ ऑडिट’ सुरू करण्यात आले आहे. मृत्यूचे नेमके कारण, उपचाराची वेळ आणि प्रक्रियेत काही विलंब झाला का याचाही तपास केला जात आहे.
दरम्यान, पोलिसही या अहवालावर आधारित पुढील कारवाई करणार असून, उपचार प्रक्रियेत काही त्रुटी आढळल्यास दोषींवर कारवाई केली जाईल.
या प्रकरणात विषारी पदार्थ किंवा इतर कोणते कारण असण्याची शक्यता तपासली जात आहे. मृत्यचे नेमके कारण फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.





