Wagholi : वाघोली येथील भैरवनाथ मंदिराजवळ गॅस गळती
Updated On:

वाघोली (प्रतिनिधी) – वाघोली तालुका हवेली येथील कापूरी विहिरीजवळ गॅस गळती झाली असून गॅसच्या पाईपलाईन मधून अचानक पेट घेतल्याने वातावरण भयभीत झाले आहे.
View this post on Instagram
या ठिकाणी गॅस गळती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासन व अग्निशामक यंत्रणा मदत कार्य करत असून नागरिकांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी केले आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याने मोठा धोका टळला आहे.





