व्हीव्हीएस लक्ष्मणची बंगालच्या प्रशिक्षकपदी फेरनियुक्ती
Updated On:

कोलकाता – भारतीय संघाचा माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याची बंगाल क्रिकेट संघाचा फलंदाजी प्रशिक्षकपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच क्रिकेट ते राजकारण असा प्रवास करणारा लक्ष्मीरतन शुक्ला देखील बंगाल क्रिकेट संघटनेच्या 23 वर्षांखालील संघाचा प्रशिक्षक बनला आहे. त्याने राजकारणातून निवृत्ती घेत पुन्हा क्रिकेटकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे.
राजकारणात गेल्यानंतर सहा वर्षांतच शुक्ला क्रिकेटकडे परतला आहे. बंगालचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू असलेल्या शुक्लाने तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी 2016 साली सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
शुक्ला हावडा (उत्तर) इथून आमदार झाला आणि नंतर त्याने क्रीडामंत्री म्हणून काम पाहिले, परंतु या वर्षाच्या सुरुवातीला त्याने या पदाचा राजीनामा दिला.





