चिखलात फळ्या टाकून केली मतदानाची सोय
Updated On:

पुणे – हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे, जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच खबरदारी घेतली आहे. काही मतदान केंद्राच्या परिसरात पावसामुळे थोडा चिखल झाला आहे, तिथे बारीक मुरुम टाकण्यात आले आहेत. तसेच पोलीस आणि स्वयंसेवक ज्येष्ठांना चिखलातून वाट काढून देण्यास मदत करत आहेत.
कै. वसंतराव टिंगरे विद्यालय येथे मतदान केंद्रात चिखल फळ्या टाकून मतदानाची सोय केली जात आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांनी मदत करत आहेत.





