Voter List : मतदार यादीतून नाव वगळल्यास खपवून घेणार नाही; ‘या’ नेत्याने दिला इशारा
झारखंडमध्ये आगामी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान (Voter List) एकाही कायदेशीर मतदाराचे नाव यादीतून वगळू देणार नाही, असा ठाम निर्धार काँग्रेसचे राज्य प्रभारी के. राजू यांनी व्यक्त केला आहे.

Voter List : झारखंडमध्ये आगामी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान (Voter List) एकाही कायदेशीर मतदाराचे नाव यादीतून वगळू देणार नाही, असा ठाम निर्धार काँग्रेसचे राज्य प्रभारी के. राजू यांनी व्यक्त केला आहे. भाजपकडून मतदारांचे मूलभूत हक्क हिसकावून घेण्याचा हा एक कट असल्याचा आरोपही त्यांनी केला.
रांची येथे पत्रकारांशी बोलताना राजू म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांपूर्वी वैध कागदपत्रे (Voter List) असतानाही सुमारे २७ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली होती. तसाच प्रकार झारखंडमध्ये होऊ दिला जाणार नाही. झारखंडमध्ये मे महिन्यात ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
या काळात तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्रांच्या अभावामुळे कोणाचेही नाव कट होऊ नये, यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना जनतेला मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील २९,००० मतदान केंद्रांपैकी १६,००० केंद्रांवर काँग्रेसने बूथ-स्तरीय एजंट (बीएलए) नियुक्त केले असून त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.
झारखंड काँग्रेसचे अध्यक्ष केशव महतो कमलेश यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत संघटना मजबूत करण्यावर आणि जनतेच्या समस्या सोडवण्यावर भर (Voter List) देण्यात आला. सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसने गाव आणि जिल्हा पातळीवरील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची जबाबदारी स्वीकारल्याचे राजू यांनी यावेळी नमूद केले.






